पुणे: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका केली होती. (thackeray vs shinde). त्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी भावनिक पत्राद्वारे उत्तर दिले होते. (shrikant shinde letter). त्यानंतर आता ह्या पत्राची पुण्यात बॅनरबाजी केली जात आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेकडून हे बॅनर लावण्यात आलेलं आहे. या बॅनर वर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रात लिहिलेला पूर्ण मजकूर छापला आहे.
काय आहे पत्रात? : उद्धव ठाकरे यांनी वडील मुख्यमंत्री, मुलगा खासदार, बायको आमदार आणि आता नाताला नगरसेवक करण्याचे डोळे लावून बसले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदें वर केली होती. त्यावर उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहिलं. श्रीकांत शिंदे यांनी या पत्रात, त्या अडीच वर्षाच्या निरागस मुलाला तुम्ही राजकारणात कशाला आणता, असं म्हणत उद्धव ठाकरेंना एक दुखावलेला बाप असं म्हटलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं .
युवा सेनेने काय म्हटले? : बॅनर लावण्याच्या संदर्भात शिंदे गटाच्या युवा सेनेने म्हटले की, तुम्ही मुख्यमंत्र्यावर टीका करा, तुम्ही त्यांच्या मुलावर टीका करा मात्र त्या अडीच वर्षाच्या मुलाचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? उद्धव साहेबांनी थोडं सांभाळायला पाहिजे होतं. त्यांना हे शोभत नाही. एका माजी मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे टीका करावी हे शोभत नसल्याने आम्ही असे बॅनर लावत असल्याचे युवा सेनेने म्हटले आहे.