ETV Bharat / city

'अयोध्या जगाची सांस्कृतिक राजधानी होण्यासाठी मार्गक्रमण सुरू'

author img

By

Published : Jan 2, 2021, 10:28 PM IST

परममित्र प्रकाशनातर्फे भारतीय जनता पक्षाचे उप-प्रदेशाध्यक्ष माधव भांडारी लिखित 'अयोध्या' या ग्रंथाचे प्रकाशन आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

स्वामी गोविंददेवगिरी महाराज
स्वामी गोविंददेवगिरी महाराज

पुणे - श्रीराम हेच या देशाचे बळ आहे. जोपर्यंत श्रीरामचे चिंतन आहे. तोपर्यंत हा देश बलवान राहणार आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या माध्यमातून जागतील सर्व श्रीराम भक्तांचे सेतूबंध तयार करण्यात येईल. अयोध्या ही जगाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, असे हे मार्गक्रमण सुरू आहे, असे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले.

या देशाचा वैभवकाळ जवळ आला असून त्याकरीता शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे बळ निर्माण होणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांकडे जसे न थकणारे, न थांबणारे, न विकले जाणारे आणि न वाकणारे असे मावळे होते. तशाच कार्यकर्त्यांच्या बळावर हे कार्य पुढे जाणार आहे, असा विश्वास स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेशराव कर्पे, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, भाजपाचे शहर सरचिटणीस राजेश पांडे, सभागृह नेते गणेश बीडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आदी मान्यवर उपस्थित होते.

अयोध्या' या ग्रंथातून मिळेल सखोल माहिती-

यावेळी बोलताना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरी महाराज म्हणाले की, याविषयावर अशा प्रकारचे पुस्तक कोणत्याच भाषेत लिहिले गेलेले नाही. अयोध्या या विषयाचा आणि त्यासाठीच्या आंदोलनाचा मी अभ्यास केला आहे. पण या अभ्यासाच्या संकलनापेक्षा अधिक सांगण्याचे काम हे पुस्तक करते आहे. मला जे माहित नव्हते, तशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात मला पहायला मिळाल्या आहेत. ग्रंथांमुळे अंतकरण किती प्रगल्भ होते, याची मला जाणीव आहे. विवेकानंदांना देखील ग्रंथांनी घडवले. त्यांच्यासारखे इतिहासाचे ज्ञान अन्य कोणालाही नव्हते. 'अयोध्या' या ग्रंथातून तुम्हला या विषयाची सखोल माहिती मिळेल. तुमच्या घरात असलेला हा ग्रंथ तुमच्या बालकांना प्रेरणा देईल. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यानंतर त्यांच्या तोलामोलाचे कोणते व्यक्तिमत्व देशात झाले असेल तर ते शिवाजी महाराजांचे आहे. कारण ते रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांच्या गोष्टींनी घडले आहेत. ज्यांना इतिहास कळतो, ते भविष्य निर्माण करू शकतात.

छत्रपती आपल्याला अजून कळले आहेत का?-

छत्रपती आपल्याला अजून कळले आहेत का हा देखील प्रश्नच आहे. रामायण आणि महाभारतातील सगळ्या सद्गुणांची यादी करा आणि ती एकत्रित बघायची असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघा, असे खुद्द स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते. छत्रपतींची प्रेरणा काहींनी खरेच घेतली आहे. तर काहींनी केवळ त्याचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावर लावला आहे.

नव्या पिढीला राम जन्मभूमीचा इतिहास माहिती होणे आवश्यक - चंद्रकांत पाटील

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नव्या पिढीला राम जन्मभूमीचा इतिहास माहिती होणे आवश्यक होते. हे केवळ या इतिहासाचे एकत्रिकरण नाही, तर याविषयाचा सखोल अभ्यास माधव भांडारी यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने केला आहे. हा इतिहास एकीकडे मनात चीड निर्माण करणारा आहे. तर दुसरीकडे श्रीरामाच्या भक्तीने ऊर भरून येणारा आहे. इतिहासाचे अनेक पैलू या पुस्तकात आहेत. बाराशे साली आपल्यावर आक्रमणे झाल्यानंतर सगळी परिस्थिती बदलली. मंदिरे तोडून आमचा स्वाभिमान दुखावण्याचा जो प्रयत्न केला. त्याला उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. विज्ञानावर आधारित आणि संस्कारांवर आधारित राष्ट्राच्या निर्माणाची सुरूवात या श्रीराम मंदिरापासून होत आहे. निसर्ग, पर्यावरण अशा सगळ्या बाबतीत जग आपल्या मार्गावर चालेल, अशा देशाची उभारणी आगामी काळात आम्हाला करायची आहे.

यावेळी 'अयोध्या' हे पुस्तक लेखनामागील भूमिका विशद करताना माधव भांडारी म्हणाले की, अयोध्या आणि राम जन्मभूमी बाबत नेहमीच अपप्रचार, संभ्रम आणि खोटे मुद्दे प्रस्थापित केले गेले. म्हणजे श्रीरामांचा जन्म भारतात झालाच नाही. इथपर्यंत प्रचार करण्यास विरोधक धजावले. रामजन्म भूमीचे आंदोलन हा वैचारिक लढाईचा भाग असून या वैचारिक लढ्याबाबत तयार केलेल्या अपप्रचाराचा प्रतिवाद म्हणजे हे पुस्तक आहे.

हेही वाचा-चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.