पुणे सांस्कृतिक राजधानी पुण्यात चार जणांनी एका तरुणीचा पाठलाग करून (Attack on Girl in Pune) तिच्या तोंडात-डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच, तिच्या सर्व कपड्यांवर आणि गुप्तांगात दारू ओतून (Liquor poured into private parts) हातावर ब्लेडने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी निगडीतल्या गंगानगरमध्ये हा प्रकार घडला आहे. तरूणीच्या बहिणाने यासंदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक (one accused arrested) केली आहे.
घडलेला प्रकार असा की पिडितेच्या 32 वर्षीय बहिणीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, चेतन मारुती घाडगे, रा. गुरुद्वारा नगर, औंध याच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तरूणी एका मंदिरातून परत जात होती. रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून ते विकत घेत होती. त्यावेळी चेतन घाडगे आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले, आणि पाठलाग करत हल्ला केला.
तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. गुरुदेव नगरीतील एका स्वच्छता गृहामध्ये घुसले. तिच्या तोंडात आणि डोळ्यात मिरची पावडर टाकली. तसेच तिच्या गुप्तांगात दारू ओतली. ब्लेडने तिच्या हातावर वार करण्यात आले. दरम्यान, आरोपी फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे (psi uttam omase) अधिक तपास करीत आहेत.