ETV Bharat / city

पुण्यात रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातलगांनी केली डॉक्टरांना मारहाण, रुग्णालयाची तोडफोड

author img

By

Published : Apr 21, 2021, 12:09 PM IST

Updated : Apr 21, 2021, 12:15 PM IST

रुग्णालयात आणलेल्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगताच, रुग्णाच्या नातेवाईकांसह 15 ते 20 जणांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केल्याचा प्रकार कोंढव्यात घडला आहे.

पुण्याचे प्राईम हॉस्पिटल
पुण्याचे प्राईम हॉस्पिटल

पुणे - रुग्णालयात आणलेल्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच रुग्णाच्या नातेवाईकांसह 15 ते 20 जणांनी डॉक्टरांना मारहाण केली व रुग्णालयाची तोडफोड केली. कोंढव्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली असून, पंधरा ते वीस अज्ञात व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय आहे प्रकार?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोंढवा येथील प्राईम हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक कार्डीयाक रुग्णवाहिका एका रुग्णाला घेऊन आली होती. डॉक्टर सिद्धांत तोतला यांनी या रुग्णांची तपासणी केली असता त्याची नाडी लागत नसल्यामुळे त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांना बोलावले. वरिष्ठ डॉ. ताबिश आणि डॉ. राहुल पाटील यांनी रुग्णाची तपासणी केली असता, तो मयत असल्याचे लक्षात आले. या डॉक्टरांनी त्या ठिकाणी जमलेल्या नातेवाईकांना ही माहिती दिली. दरम्यान आपला रुग्ण मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पंधरा ते वीस जणांच्या जमावाने डॉक्टरांवर हल्ला चढवला. डॉक्टर सिद्धांत तोतला यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. त्याचप्रमाणे हॉस्पिटलच्या अकाउंटंटला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हॉस्पिटलच्या समोरील दरवाजावर दगडफेक करत तोडफोड केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून कोंढवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा - पुणे शहरात 24 तासांत 5 हजारापेंक्षा जास्त रुग्ण आढळले

Last Updated : Apr 21, 2021, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.