ETV Bharat / city

Atrocity Case Filed : पुण्यात शिवसेनेच्या माजी आमदारासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल - माजी नगरसेवक नारायण लोणकर

पुण्यात मासे विक्रेत्याला मारहाण, शिविगाळ केल्या प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर ( Former Shiv Sena MLA Mahadev Babar ), माजी नगरसेवक नारायण लोणकर यांच्यासह 7 जणांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल ( atrocity under case Filed ) करण्यात आला आहे. भारत बंदच्या दिवशी दुकान बंद कर असे म्हणत माजी आमदार बाबर यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. पोलिसात तक्रार दाखल करण्य़ासाठी गेल्यावर मासे विक्रेत्यालाचा मारहाण शिविगाळ करम्ठायात आली होती.

Atrocity Case on Mahadev Babar
महादेव बाबरांवर अट्रोसिटी
author img

By

Published : Jul 7, 2022, 1:04 PM IST

पुणे - पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर ( Former Shiv Sena MLA Mahadev Babar ) , माजी नगरसेवक नारायण लोणकर (Former corporator Narayan Lonakar ) आणि कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांच्यासह 8 पोलिस कर्मचाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी तक्रार देण्यास गेल्यानंतर हा प्रकार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मासे विक्रेत्याने न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली होती.

15 जणांवर गुन्हा दाखल - माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद,गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक पोलिस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमक प्रकरण काय ? - भारत बंदच्या दिवशी आज भारत बंद आहे तुझे मासे विक्रीचे दुकान बंद कर असे म्हणत माजी आमदार बाबर यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. त्यावेळी संबंधित मासे विक्रेता हा दाद मागण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र त्यावेळी पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी त्या मासे विक्रेत्याला मारहाण केली होती. त्यानंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्याने न्यायालायत धाव घेतली होती. त्याचा न्यायालयाकडून निकाल लागला असून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, या आधीही पोलीस अधिकाऱ्यांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतच बेलापूरच्या सहायक पोलीस निरीक्षकावर ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरात घरकाम करणाऱ्या मोलकरणीला मारहाण करत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) आणि त्याच्या पत्नीविरोधात अॅट्रोसिटी (Atrocity) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर (CBD belapur) पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप पाटील आणि पत्नी रुचा पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde Takes Charge : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्रालयात पदभार स्वीकारला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.