ETV Bharat / city

ब्लास्ट करून ATM मशीनची चोरी, सीसीटीव्हीला सॅल्यूट करत चोरटे फरार - ATM machine stolen by explosion

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरात चोरांनी स्फोटके लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

ब्लास्ट करून ATM मशीनची चोरी
ब्लास्ट करून ATM मशीनची चोरी
author img

By

Published : Jul 21, 2021, 8:42 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरात चोरांनी स्फोटके लावून एटीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोट घडवून चोरट्यांनी काही पैसे घेऊन पोबारा केले आहे.

ब्लास्ट करुन ATM मशीनची चोरी, सीसीटीव्हीला सॅल्यूट करत चोरटे फरार

स्फोटात एटीएमच्या खोलीच्या दरवाजाच्या काचा आणि पत्रे लांबपर्यंत उडून पडले होते. यावरुन स्फोटाचा अंदाज लावता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील वसुली गावच्या हद्दीतील हिताची कंपनीचे एटीएम आहे. मध्यरात्री त्या एटीएममध्ये अचानक स्फोट झाला. विशिष्ट प्रकारच्या स्फोटकांनी हा स्फोट घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

स्फोटकं लावून एटीएम मशीन फोडले

स्फोटात एटीएम मशिनचा अर्धा भाग फुटला असून काचांचा चक्काचूर झाला आहे. स्फोटामुळे मशिनमधील काही रक्कम बाहेर फेकली गेली तर काही रक्कमही स्थानिक ग्रामस्थ जागे झाल्याची चाहूल लागताच एटीएमच्या न फुटलेल्या भागात सुरक्षित राहिली. मशीनमध्ये अंदाजे 40 लाखांच्या आसपास रक्कम असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून किती रक्कम चोरीला गेली आहे, हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलायचे वरिष्ठ अधिकारी स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी इतर पथकांच्या मदतीने तपास करत असून यामध्ये श्वान पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, एसआरपीएफ, क्राईम ब्रांच, एटीएस व इतर समांतर पथके घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - ...या बे, VIDEO पाहा बे पोट्टेहो! मास्तरांच्या खास शैलीतून स्पर्धा परीक्षा, गर्लफ्रेन्ड अन् बरंच काही...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.