पुणे - पिंपरी - चिंचवड शहरातील चिखली येथे जिलेटीन कांड्यांचा ( ATM blown up with gelatin sticks ) स्फोट घडवून एटीएम फोडले ( ATM blown up in Chikhali ) आहे. एटीएमच्या आतील बॉक्सला काही न झाल्याने लाखो रुपये सुरक्षित राहिले. अज्ञातांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले. या प्रकरणी चिखली पोलीस आणि बीडीडीएस चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली असून, अज्ञात दोघांनी हे कृत्य केल्याचे पुढे येत आहे.
हेही वाचा - Girish Mahajan Criticized Eknath Khadse : 'एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली ( Chikhali ATM blown up ) येथील कॅनरा बँकेचे एटीएम लुटण्याचा उद्देशाने अज्ञातांनी जिलेटीन कांड्यांचा ब्लास्ट घडवून आणला. या घटनेत एटीएम मशीन फुटले असून पैसे असलेला बॉक्स सुरक्षित राहिला. जिलेटीन कांड्या एटीएमच्या पाठीमागे लावण्यात आल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना आज (गुरुवारी) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. जिलेटीन कांड्यांचा ब्लास्ट मोठा झाल्याने शेजारी राहणारे नागरिक झोपेतून उठले तेव्हा अज्ञात दोन आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला. अद्याप एटीएम फोडण्यासाठी किती जिलेटिन कांड्या वापरण्यात आल्या या विषयी माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा - BJP MLA Ganesh Naik Case : भाजपा आमदार गणेश नाईकांना लवकरच अटक केली जाईल - रुपाली चाकणकर