ETV Bharat / city

False Information a Policeman : आपण पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांना लुटणाऱ्याला अटक

आपण स्वत: पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या ठगाला शिवाजीनगर (False Information a Policeman ) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Crime pune shivaji nagar shrigonda) याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी माहिती दिली. जाफर अलिखान इराणी असे आरोपीचे नाव असून, पुणे पोलिसांनी या महाठगाला अटक केली आहे.

author img

By

Published : Jan 25, 2022, 4:47 AM IST

शिवाजीनगर पोलीस स्टेशन
शिवाजीनगर पोलीस स्टेशन

पुणे - पोलीस अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या ठगाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी माहिती दिली. (False Information a Policeman ) जाफर अलिखान इराणी असे आरोपीचे नाव असून, पुणे पोलिसांनी या महाठगाला अटक केली आहे.

प्रतिक्रिया

फौजफाट्यासह पोलिसांनी सापळा अटक केली

जाफर अलिखान इराणी आपण कस्टम आणि पोलीस (Shivajinagar Iranian settlement) अधिकारी असल्याचे सांगून लोकांना लुटायचा. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र, तो पुण्यातील शिवाजीनगरमधील इराणी वस्तीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आणि त्यानंतर फौजफाट्यासह पोलिसांनी सापळा लावून या ठगाला अटक केली.

इराणीवर महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली गुन्हे दाखल आहेत.

हरियाणामध्ये जाफर इराणी मोस्ट वॉन्टेड होता. त्याच्यावर इराणीवर महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली गुन्हे दाखल आहेत. प्राथमिक तपासात जाफर इराणी याच्यावर १५ ते २० गुन्हे दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. हरियाणा येथे त्याने कस्टम अधिकारी असं सांगून सराफ व्यावसायिकांचे तब्बल १ किलो सोने लुटले होते.

पुढील तापस श्रीगोंदा पोलीस करणार आहेत

याचबरोबर श्रीगोंदा नगर जिल्हा येथे एका वाहन चालकाला अडवून पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने २७ हजार रुपये उकळले होते. मात्र, इराणीला शिवाजी नगर पोलिसांच्या हातावर तुरी देण्यास अयशस्वी झाला. शिवाजी नगरच्या पोलिसांनी या महाठगाला अटक करुन श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तापस श्रीगोंदा पोलीस करणार आहेत.

हेही वाचा - Poonam Mahajan Twitter : 'दोन्ही मर्दानी हिंदुत्वसाठी युती केली होती'! पुनम महाजन यांचे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.