ETV Bharat / city

पुण्यात लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली विशेष वाहने लष्करात दाखल - स्वदेशी वाहने लष्करात दाखल

पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (बीईजी) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये लष्करप्रमुखांनी स्वदेशी पद्धतीने ( Army Chief MM Naravane included Indigenous vehicles ) विकसित केलेल्या काही वाहनांना लष्कराच्या सेवेत दाखल करून घेतले. लष्करप्रमुख एम.एम.नरवणे ( Army Chief MM Naravane in pune ) हे लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह दोन दिवसांच्या पुणे ( Army Chief Narwane visits Pune ) भेटीवर आले आहेत.

Army Chief MM Naravane included Indigenous vehicles
स्वदेशी वाहने पुणे लष्कर प्रमुख नरवणे
author img

By

Published : Apr 13, 2022, 7:21 AM IST

पुणे - पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर ग्रुप (बीईजी) येथे आयोजित कार्यक्रमामध्ये लष्करप्रमुखांनी स्वदेशी पद्धतीने ( Army Chief MM Naravane included Indigenous vehicles ) विकसित केलेल्या काही वाहनांना लष्कराच्या सेवेत दाखल करून घेतले. लष्करप्रमुख एम.एम.नरवणे ( Army Chief MM Naravane in pune ) हे लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्यासह दोन दिवसांच्या पुणे ( Army Chief Narwane visits Pune ) भेटीवर आले आहेत. यावेळी त्यांनी हे कार्य केले.

वाहनांची पाहणी करताना लष्करप्रमुख एम.एम.नरवणे

हेही वाचा - Raghunath Kuchik Case : राजकीय भांडवलासाठी मुलींबाबतच्या केसेसचा वापर नको - निलम गोऱ्हे

लष्करात क्यूआरएफव्ही अर्थात मध्यम क्षमतेची त्वरित प्रतिसाद लढाऊ वाहने, आयपीएमव्ही अर्थात लष्कर संरक्षित वाहतूक वाहने, टीएएसएल अर्थात टाटा अडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीद्वारे निर्मित अत्यंत दीर्घ पल्ल्याची निरीक्षण यंत्रणा, तसेच भारत फोर्ज या कंपनीद्वारे निर्मित मोनोकॉक हल मल्टीरोल माईन संरक्षित सशस्त्र वाहन या विशेष वाहनांची पहिली तुकडी लष्करात दाखल झाली आहे.

भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमाला बळकटी देण्यासाठी टाटा आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी दर्शविलेल्या वचनबद्धतेबद्दल, तसेच गेल्या अनेक दशकांमध्ये भारतीय लष्कराच्या मदतीसाठी सतत केलेल्या कार्याबद्दल लष्कर प्रमुखांनी त्यांची प्रशंसा केली. टीएएसएल आणि भारत फोर्ज या कंपन्यांनी स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या या वाहनांचा भारतीय लष्करात समावेश झाल्यामुळे लष्कराच्या भावी कारवायांमध्ये परिचालनविषयक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या कार्यक्रमाला लष्कराच्या सेवेत कार्यरत असलेले तसेच सेवेतून निवृत्त झालेले अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - Athavale says on JNU : कोणी नॉनव्हेज न खाण्याची भूमिका घेते तर चूक नाही - आठवले

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.