पुणे - न्यायालय परिसरातून 1 ऑक्टोबरला बेपत्ता झालेले ॲड. उमेश मोरे (वय 33) यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान आणखी एका वकिलाचे नाव समोल आले असून पोलिसांनी त्यालाही अटक केली. घनश्याम दराडे असे अटक करण्यात आलेल्या वकिलाचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यापूर्वी पोलिसांनी कपिल विलास फलके (वय 34), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32) या तिघांना अटक केली आहे. आरोपी ॲड. घनशाम दराडे याने अपहरण होण्याआधी मयत उमेश मोरे यांची माहिती आरोपींना दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
असा झाला खून
आरोपी कपिल फलके आणि दीपक वांडेकर यांनी 1 ऑक्टोबरला उमेश मोरे यांचे शिवाजीनगर न्यायालय परिसरातून गोड बोलून चारचाकीतून अपहरण केले. त्यानंतर गाडीतच त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ताम्हीणी घाटात नेऊन पेट्रोल ओतून जाळला. दरम्यान अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना घटनेच्या दिवशी काही व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाल करताना दिसल्या होत्या. त्यांना डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींना अटक केली.
ॲड. उमेश मोरे खूनप्रकरणी आणखी एका वकिलाला अटक