पुणे - हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही. हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल ( Hijab row verdict by Karnataka High court ) देताना म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर नेते, तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. या निकालावर मूल निवासी मुस्लीम मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयात दाखल केलेली याचिका ही चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आल्याचे इनामदार ( Anjum Inamdar on Hijab row verdict ) म्हणाले.
हेही वाचा - Schoolgirl Attack in Pune : एकतर्फी प्रेमातून पुण्यात शाळकरी मुलीवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला
कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत. अंजुम इनामदार म्हणाले की, ज्या मुलींच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली होती. ती याचिका चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आली होती. कोणतीही याचिका ही धर्माच्या आधारे, आस्थेच्या आधारे टिकत नाही, असे मत इनामदार याने व्यक्त केले.
काय आहे प्रकरण?
उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटले. मुस्लीम विद्यार्थिंनींना शाळा किंवा कॉलेजमध्ये हिजाब घालण्याला विरोध करण्यात आला. कर्नाटकमध्ये अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधात निदर्शने झाली. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व हायस्कूल आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
यांनी दिला पाठिंबा
एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विद्यार्थिनींना पाठिंबा दिला. मुस्लीम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करणे हे त्यांच्या घटनात्मक अधिकारांचे मूलभूत उल्लंघन आहे, असे म्हटले. तसेच, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी महिलांना हवे ते परिधान करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे, असे म्हटले होते.
हिजाब वादावर मलालानेही केले होत ट्विट
नोबेल शांतता पारितोषिक विजेती मलाला युसुफझाईने देखील या प्रकरणावर भाष्य केले होते. मलाला म्हणाली होती की, मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्यापासून रोखणे भयावह आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लीम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.
हेही वाचा - Daund Accident News : दौंडमध्ये स्कूल बस आणि कारचा भीषण अपघात; विद्यार्थीनीचा मृत्य