पुणे - पुणे शहराला विद्येच माहेरघर ( Pune city is the home of education ) म्हटले जाते. याच पुणे शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून देशभरातील तसेच जगभरातून अनेक विद्यार्थी हे पुणे शहरात शिक्षणासाठी येत असतात. अशा या शिक्षणीक राजधानी असलेल्या पुणे शहरात आजही अनेक असे विद्यार्थी आहे जे शिक्षणापासून वंचित ( Students deprived of education ) आहे. खास करून पुण्यातील झोपडपट्टी तसेच फुटपाथवर राहणाऱ्या नागरिक, ज्यांच्याकडे काहीही कागदपत्रे नाही. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे काय हा प्रश्न नेहेमी उपस्थित केला जातो. अशा मुलांसाठी पुण्यातील तृतीयपंथी अमित मोहिते ( Amit Mohite ) याने पुढाकार घेतला असून गेल्या 1 वर्षापासून अमित ह्या मुलांना शिकवत आहे.
फुटपाथवर शाळा - पुणे शहरातील मालधक्का चौक जवळील पुणे रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या राजीव गांधी मार्गावरील ( Rajiv Gandhi Marg ) फुटपाथवर 40 पेक्षा अधिक झोपड्या आहेत. जवळपास 200 लोक फुटपाथवर झोपडी टाकून राहतात. या झोपड्यातील नागरिक तसेच यांचे मुले ही रस्त्यावर फुगे, खेळणी तसेच भीक मागून आपली उपजीविका भागवतात. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमित मोहिते याने सावली या संस्थेच्या माध्यमातून फुटपाथवरच मागच्या वर्षी शाळा सुरू केली. सोमवार ते शुक्रवार दररोज 2 ते 3 तास तो शाळा चालवून येथील 60 ते 65 विद्यार्थ्यांना शिकवतो. याच बरोबर अमित हा स्वारगेट परिसरात देखील जे फुटपाथवर मुले राहतात त्यांच्यासाठी तो शाळा चालवत आहे. समाजात अनेक दुर्लक्षित घटक असून अजूनही ते मुख्य प्रवाहात नाही.
सावली संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू - त्यांना प्राथमिक मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने मागच्या वर्षी आम्ही सावली संस्थेच्या निमित्ताने शाळा सुरू केली. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच्या प्रमाणे या मुलांना शिक्षण मिळावे. ते ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन शिकून पुढे जावे, म्हणून आम्ही ही शाळा सुरू केली. या शाळेत आम्ही या मुलांना बेसिक नॉलेज तसेच शाळेतील शिक्षण देत असतो अशी माहिती यावेळी तृतीयपंथी अमित मोहिते यांनी यावेळी दिली.
अशी चालते शाळा - ही फुटपाथ वरील शाळा सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 11 ते 12 :30 वाजेपर्यंत चालते.शहरात दोन ठिकाणी अमित हा सध्या शाळा घेत आहे. मालधक्का चौक, स्वारगेट येथे ही शाळा सुरू असते. या दोन्ही शाळेमध्ये सध्या 60 ते 65 मुले ही शिक्षण घेत आहे.अशी माहिती देखील यावेळी अमित याने दिली.
हेही वाचा - Arjun Khotkar : दोन दिवसांपूर्वी बंडखोरांना 'उंदीर' म्हणणारे शिवसेनेचे 'अर्जुन' शिंदे गटात?; चर्चेला उधाण