ETV Bharat / city

ABVP Protest In P Jog school : पी. जोग विद्यालयाला कुलूप ठोकून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध व्यक्त - Akhil Bharatiya Vidyarthi Parishad

कोथरूडमधील पी. जोग विद्यालयाच्या सावळ्या कारभाराची उघड सीबीएसई बोर्डच्या नुकत्याच लागलेल्या निकालावरून दिसून आली. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( All India Student Council ), पुणे महानगरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तब्बल ६०% विद्यार्थ्यांचे भविष्य या विद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ( Negligence of school administration ) टांगणीला लागले आहे.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
author img

By

Published : Jul 24, 2022, 12:23 PM IST

पुणे - नुकताच सीबीएसई बोर्डचा ( CBSC Result ) इयत्ता १० वीचा निकाल लागला. कोथरूडमधील पी. जोग विद्यालयाच्या सावळ्या कारभाराची उघड या निकालानंतर लागलेली दिसून आली. इयत्ता १० वीचे शिक्षण घेणाऱ्या तब्बल ६०% विद्यार्थ्यांचे भविष्य या विद्यालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ( Negligence of school administration ) टांगणीला लागलेले दिसून आले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध

विद्यालय प्रशासनाचा भोंगळ कारभार - विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad ), पुणे महानगरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी प्रशासनाशी बोलण्याचा व प्रश्न मार्गी लावण्यासाठी तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न केला. मात्र, विद्यालय प्रशासनाकडून काहीही सकारात्मक उत्तरे मिळाली नाहीत. या सर्व विषयासंबंधीत विद्यालयातील अधिकाऱ्यांनी देखील पळ काढला व समोर येण्यास कारणे देत मनाई केली. जी मुले पास झाली त्यांच्या निकालामध्ये देखील काही स्पष्टता नसल्याचे संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांचे मत आहे.

पालकांचे विद्यालय प्रशासनाला प्रश्न - या सर्व गोंधळाच्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विद्यार्थी आणि पालकांच्या बाजूने विद्यालय प्रशासनाला ( School Administration ) प्रश्न विचारत होते. तेव्हा समोरून कसल्याही प्रकारची सकारात्मक बाजू मांडण्यात आली नाही. तसेच, या सर्व प्रकरणात विद्यालयाची जी बाजू आहे अथवा विद्यार्थ्यांचे कसल्याही प्रकारचे नुकसान विद्यालय होऊ देणार नाही. असे लेखी पत्रक जेव्हा मागण्यात आले, तेव्हा आम्ही लेखी पत्रक देण्यासाठी बांधील नाही, असे उत्तर विद्यालयाचे चेअरमन अमोल जोग यांनी दिले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आवाहन - आपल्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याची विद्यालय प्रशासनाला काही काळजी आहे की नाही? असा प्रश्न समोर उभा आहे. या विद्यार्थ्यांच्या हक्काच्या शिक्षणासाठी विद्यालय प्रशासनाला लागेल ती जबाबदारी उचलावीच लागेल व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी विद्यालय प्रशासनाला केले. घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या व गैर जबाबदारी ने वागून विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या पी जोग विद्यालयाच्या प्राचार्याच्या खुर्ची वर दगड ठेवून व विद्यालयाच्या गेटला कुलूप लावून विद्यार्थी परिषद ( student council ), व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी निषेध व्यक्त केला.

हेही वाचा - Neeraj Chopra success celebration: नीरज चोप्राच्या घरी आनंद साजरा; गाण्यांच्या तालावर महिलांचा ठेका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.