ETV Bharat / city

Ajit Pawar : निवडणूक आयोगाने चिन्हे गोठविणे नवीन नाही – अजित पवार - Ajit pawar statement on shivsena

शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (party chief Uddhav Thackeray) यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षासंदर्भात दावे दाखल केले होते. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय ( election commission decision ) घेतला आहे.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Oct 10, 2022, 11:22 AM IST

बारामती : शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (party chief Uddhav Thackeray) यांनी निवडणुक आयोगाकडे पक्षासंदर्भात दावे दाखल केले होते. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय ( Shiv Sena decision to freeze election symbol ) घेतला आहे. तो निर्णय राज्यासाठी आणि देशासाठी काही नवीन नसल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलत सांगितले.

पवार पुढे म्हणाले, देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष काँग्रेसने १९५१-५२ मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडणूक तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढवली होती. यामध्ये काँग्रेसचे निवडणूक चिन्ह दोन बैलजोडी होती, यानंतर नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. पण ताश्कंदमध्ये त्यांच्या आकस्मिक निधनानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यावेळी काँग्रेसचे नियंत्रण कामराज यांच्या नेतृत्वाखालील सिंडिकेटच्या हातात होते. नंतरच्या काळात इंदिरा गांधी पंतप्रधान राहिल्या पण काँग्रेसमध्ये भांडणे सुरू झाली. अखेर १९६९ मध्ये काँग्रेस फुटली. मूळ काँग्रेसचे नेतृत्व कामराज आणि मोरारजी देसाई यांनी केले आणि इंदिरा गांधी यांनी काँग्रेस (आर) नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. मात्र, बहुतांश खासदारांचा पाठिंबा इंदिराजींना होता. पक्ष फुटल्याने पक्षाच्या चिन्हाचा ताबा घेण्यावरून वाद सुरू झाला. काँग्रेस (ओ) म्हणजेच काँग्रेस मूळ आणि काँग्रेस (आर) हे दोन्ही पक्ष बैलजोडीच्या निवडणूक चिन्हावर आपला दावा सांगत होते. जेव्हा हे प्रकरण भारताच्या निवडणूक आयोगाकडे पोहोचले तेव्हा त्यांनी काँग्रेसला बैलजोडीचे चिन्ह (ओ) दिले. अशा स्थितीत इंदिराजींनी आपल्या काँग्रेससाठी गाय-वासरू हे निवडणूक चिन्ह घेतले होते.

अजित पवार

इंदिराजींनी काँग्रेस (आय) नवा पक्ष स्थापन केला : १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाल्यानंतर, त्यांच्या अनेक काँग्रेस सहकाऱ्यांना इंदिराजी संपल्यासारखे वाटले. त्यामुळे काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीं विरोधात पुन्हा असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली होती. ब्रह्मानंद रेड्डी आणि देवराज अर्स यांच्यासह अनेक काँग्रेस लोकांना इंदिराजींना बाजूला करायचे होते. अशा स्थितीत जानेवारी १९७८ मध्ये इंदिराजींनी पुन्हा काँग्रेस तोडून नवा पक्ष स्थापन केला. त्याला काँग्रेस (आय) असे नाव दिले. यावेळी इंदिरा गांधींनी निवडणूक आयोगाकडे नवीन निवडणूक चिन्हाची मागणी केली. तेव्हा निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले. काँग्रेसने नवे निवडणूक चिन्ह म्हणून हाताचा पंजा घेतला. असे अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे आयोगाने शिवसेनेचे चिन्हे गोठविणे नवीन नसल्याचे अजित पवारांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.