ETV Bharat / city

सगळं सांगणार, पण पाहुणे अजूनही घरातच... आयकर धाडीवर हे म्हणाले उपमुख्यमंत्री - deputy cm ajit pawar on income tax raid

मी राज्यात किती कारखाने विकले. कोणाच्या काळात विकले गेले. त्याच्या किमती काय आहे. किती कारखाने चालवायला दिले. कोणाच्या काळात दिले गेले त्याची काय अवस्था आहे, हे सगळं सांगेन. पुण्यातील विधानभवन येथील आयोजित कोरोना आढावा बैठकीत त्या हे मत व्यक्त केले.

ajit pawar
ajit pawar
author img

By

Published : Oct 8, 2021, 8:26 PM IST

पुणे - अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे टाकले आहेत. सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाचे धाडसत्र सुरूच आहे. आता सध्या चौकशी सुरू आहे. आयटी लोक त्यांचे काम करत आहेत. त्यांचे काम झाल्यावर मी माझे म्हणणे मांडणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

सगळ सांगणार, पाहुणे अजूनही घरातच

आयकर विभागाला कुठल्याही कंपनीवर छापा मारण्याचा अधिकार असतो. तो अधिकार त्यांना कायद्याने दिलेला आहे. त्यांच्या चौकशीत मला व्यत्यय आणायचा नाही. त्यांचे काम झाल्यावर मी राज्यात किती कारखाने विकले. कोणाच्या काळात विकले गेले. आणि त्याच्या किमती काय आहे. किती कारखाने चालवायला दिले. कोणाच्या काळात दिले गेले त्याची काय अवस्था आहे. जे कारखाने विकले गेले ते कुणामुळे विकले गेले याबाबत सविस्तर माहिती देईन असेही यावेळी पवार यांनी सांगितलं. पुण्यातील विधानभवन येथील आयोजित कोरोना आढावा बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले.

हेही वाचा - कोल्हापूर : दुसऱ्या दिवशीही अजित पवार यांच्या बहिणीच्या ऑफिसवर आयकर विभागाचे छापे

लखीमपूर दुर्घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद
11 तारखेला देशातील शेतकऱ्यांना जे काही चिरडण्याचा काम करण्यात आले. ही घटना देशाला काळिमा फासणारी घटना आहे. येणाऱ्या काळात हा दिवस काळा दिन म्हणून ओळखला जाईल. त्याबाबतचा निषेध म्हणून महाराष्ट्र बंदचा निर्णय महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करू
जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. पण, आमच्यात तिन्ही पक्षांच्या विरोधातला पक्ष जो सत्तेवर आहे त्यांना न येण्याबाबत आम्ही एकत्रित यायचा प्रयत्न करु. तसेच राज्य स्तरावर निर्णय घेऊ. जिल्ह्याच्या ठिकाणी नेत्यांना राज्यस्तरावर सांगितले जाईल. त्यामुळे आमचा एकत्रित लढण्याचा प्रयत्न असणार आहे. असे देखील यावेळी अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा - अफगाणिस्तानात मशिदीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 100 ठार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.