ETV Bharat / city

Ajit Pawar on Sharad Pawar Statement : 'शपथविधीवर जेव्हा मला वाटेल तेव्हा मी बोलेल, तो माझा अधिकार आहे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही. आणि 'नो कमेंट्स' असं म्हणत ते थांबले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या संदर्भात मेळाव्याचे आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Dec 30, 2021, 3:46 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2019 च्या विधानसभा ( Maharashtra Assembly Election 2019 ) निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या संदर्भातील अनेक खुलासे केले. त्यात त्यांनी अजित पवारांच्या सकाळच्या शपथविधीवरही ( Ajit Pawar Oath with Devendra Fadanvis ) भाष्य केले. त्यावर अजित पवार यांना विचारले असता म्हणाले (Ajit Pawar on Sharad Pawar Statement ), की मी याआधीच सांगितल की मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. ज्यावेळेला मला वाटेल तेव्हा मी बोलेल. तो माझा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही. आणि 'नो कमेंट्स' असं म्हणत ते थांबले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या संदर्भात मेळाव्याचे आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते ( Ajit Pawar in Pune) उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'शपथविधीवर जेव्हा मला वाटेल तेव्हा मी बोलेल, तो माझा अधिकार आहे'

आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही -

महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात विधानसभा अध्यक्षपदावरून कलगीतुरा रंगलेला पहायला मिळत आहे. अधिवेशन संपले तरी हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यात आले होते. पत्रातील भाषेबद्दल राज्यपालांनी पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर अजित पवार म्हणाले, राज्यपाल यांना जे पत्र पाठवण्यात आलं होतं, त्यात घटनात्मक बाबी उपस्थित करण्यात आल्या. बहुमत असताना देखील आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही त्यादिवशी घेतली नाही. आम्हाला ती निवडणूक घेता येत होती. पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नव्हता. ते महत्त्वाचं पद आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे. आम्ही सर्व प्रमुख नेते भेटून त्यांना समजावून सांगू आणि यात तज्ञांचा देखील सल्ला घेऊ. 2 महिने हातात आहे. 2 महिन्यांनंतर अधिवेशन आहे. राज्यपालांनी सांगूनही निवडणूक घेतली असती तर तो आमचा असमजुतदार असता. मात्र काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा काय, असेही यावेळी पवार म्हणाले.

नियमांचे पालन सर्वांनी करावे -

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कुठल्याही राज्यकर्त्याला निर्बंध कठोर करावेच लागतात. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. आपल्या घरातील नागरिकांना देखील याची बाधा होत आहे. ओमायक्रॉनची तीव्रता कमी असेल पण शेवटी तो कोरोनाच आहे. खबरदारी घेणं हे प्रत्येकाचे काम आहे. ओमायक्रॉनच्या बाबतीत खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे. याचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत आहे. लॅब वाढवायचे किंवा नाही. की त्याच लॅबमध्ये काम करायचे याबाबत देखील आज बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीबाबत मध्यप्रदेश पॅटर्न -

महापालिका निवडणुकीबाबत आम्ही सभागृहात एकमताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत निवडणूका घेण्यात येऊ नये. अशा संदर्भातील निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला आम्ही सर्वांनी पत्र दिले आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.