पुणे - भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस संचलन मैदान येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला.यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 11 सप्टेंबरला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकार कडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. राज्याच्या बाबतीत एका गोष्टीची काळजी असुन मधल्या काळात वन नेशन वन टॅक्स ही योजना सुरू करण्यात आली आणि त्यातून जीएसटी सुरू झाली. जीएसटी च्या स्वरूपात जे पैसे केंद्र सरकार राज्यांना देत होते ते या वर्षीपासून बंद करण्यात येणार आहे. कारण सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असं केंद्र सरकार कडून ठरलं होतं. पण कोरोना काळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसे आणखीन दोन वर्षे द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक घेण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहे. आम्ही राज्याचा भांडवली खर्च किती आहे मागील तिमाहीत किती उत्पन्न जमा झाला आहे याची माहिती घेत आहोत. केंद्राने जीएसटीकडून मिळणाऱ्या पैश्यांची कालावधी दोन वर्षे वाढवावी अशी आमची मागणी आहे, असे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.
निवडणूका उशिरा झाल्या तरी काही बिघडत नाही -
ओबीसी आरक्षणासह आगामी निवडणुका व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. राज्य मागासवर्गीय आयोगला पूर्णपणे स्वायत्तता आहे. पण राज्य सरकार यामताशी आहे की कुठल्याही परिस्थितीत एसटी एससीची जनसंख्या लक्षात घेता. त्यांना आरक्षण देऊन 50 टक्के आरंक्षणात जेवढी गॅप उरेल तिथं तरी ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. ही राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. निवडणुकीच्या बाबतीत आमची हीच भूमिका आहे की काही काळासाठी प्रशासक नेमावा लागला तरी चालेल पण जेवढ्या लवकरात लवकर निर्णय आयोगाच्या माध्यमातून होईल तेवढं चांगलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावं त्यासाठी निवडणूका दोन ते तीन महिने उशिरा झाल्या तरी काही बिघडत नाही.काही आकाश पाताळ एक होत नाही.अस यावेळी ओबीसी आरक्षणाबाबत आणि आगामी निवडणुकीबाबत अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं.
चंद्रकांत पाटील खूप मोठे नेते
अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की चंद्रकांत पाटील हे खूप मोठे नेते आहे.अजित पवार सारख्या छोट्या माणसाने त्यांच्यावर बोलणं योग्य नाही असं म्हणत पाटील यांना पवार यांनी टोला लगावला आहे.