पुणे - मार्च महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवा सोमवारपासून सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक विमानतळांवर सध्या प्रवाशांची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे विमानतळही सोमवारपासून सुरू झाले असून सकाळपासून आठ विमानांनी 985 प्रवाशांना घेऊन उड्डाण केले. तर दिल्लीसह वेगवेगळ्या शहरातून आलेल्या नऊ विमानातून 672 प्रवासी पुण्यात दाखल झाले आहेत.
केंद्र सरकारच्या देशांतर्गत विमानसेवेच्या घोषणेनंतर विमानतळ प्राधिकरणाने विमान उड्डाणाचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पुण्यातून 17 उड्डाणे पार पडली. सोमवारी सकाळपासून पुणे विमानतळावर प्रवाशांची लगबग सुरू होती. याठिकाणी कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन करण्यात येत आहे. फिजिकल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा यासाठी प्रवाशांना माहिती दिली जात होती.