ETV Bharat / city

Chandrakant Patil : पुणे शहरासाठी विमानसेवेचा विस्तार होणे आवश्यक - चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटील पुणे विमानतळ प्रतिक्रिया

पुणे शहराचा (Pune) मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि विकास होत आहे. शहराचा विकास आणि विस्तार होताना पुण्यातील विमानतळ (Pune Airport) अपुरे पडत असून, यासाठी पुढील काळामध्ये पुण्यामध्ये छोटी तीन-चार विमानतळं उभारणे गरजेचे आहे, असे मत चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले.

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Jan 9, 2022, 12:35 AM IST

Updated : Jan 9, 2022, 5:27 AM IST

पुणे - पुणे शहराचा (Pune) मोठ्या प्रमाणावर विस्तार आणि विकास होत आहे. शहराचा विकास आणि विस्तार होताना पुण्यातील विमानतळ (Pune Airport) अपुरे पडत असून, यासाठी पुढील काळामध्ये पुण्यामध्ये छोटी तीन-चार विमानतळं उभारणे गरजेचे आहे. यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि गिरीश बापट (Girish Bapat) यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केले आहे.

माहिती देताना चंद्रकांत पाटील

पुरंदर विमानतळासंदर्भात क्लब ऑफ इन्फ्यूएन्सरच्यावतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रानंतर चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाड़ी सरकारने जुन्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवली-

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरंदर विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडी सरकारने जुना प्रस्तावाला केराची टोपली दाखवून नवीन प्रस्ताव सादर केला. सदर नवीन प्रस्तावातील तांत्रिक अडचणींमुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने तो नाकारला. त्यामुळे जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? असा सवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

लोहगाव विमानतळाच्या सोयीसुविधा वाढवाव्या -

सध्याच्या लोहगाव विमानतळाच्या सोयीसुविधा वाढवाव्या लागतील कारण की नवीन विमानतळ तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. यासाठी सत्ताधाऱ्यांनी विचार करावा असे आमचे मत आहे. निवृत्त एअर व्हॉईस मार्शल भुषण गोखले यांना पुण्याभोवतीच्या चार पाच साईट्स एअरपोर्टसाठी निवडण्याची जबाबदारी देण्यात यावी. तसेच, पुरंदर विमानतळासाठी कोणाचेही हितसंबंध न जोपासता सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी दर शुक्रवारी यासंदर्भात शासकीय पाठपुरावा घेण्यासाठी बैठक घ्यावी, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

Last Updated : Jan 9, 2022, 5:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.