पुणे - संसदेने मंजूर केलेल्या ट्रिपल तलाक कायद्याविरोधात शुक्रवारी विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच आंदोलकांच्या वतीने मुस्लीम महिलांवर अन्याय व अत्याचार करणारा कायदा रद्द करा, असे निवेदन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले. यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंच, काँग्रेस, एमआयएम, आदी पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मूलनिवासी मुस्लीम मंचचे अंजुम इनामदार म्हणाले, देशातील 2 कोटी 85 लाख महिलांनी या कायद्या विरोधात विविध संवैधानिक संस्थांना निवेदन दिले आहे. मात्र, तरीही सरकारने हा कायदा लागू केला. त्यामुळे या कायद्यावला मंजुरी देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केल्याचे ही त्यांनी सांगितले.