पुणे - सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे शहरातील उद्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात आल्यामुळे आजपासून उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली करण्यात आली आहेत.
शहरातील उद्याने सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 7 या दोन तासात सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय 10 वर्षाखालील मुलांना आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्यात येणार नाही.
सात महिन्यानंतर पुणे शहरातील उद्याने उघडली, नागरिकांची तुरळक गर्दी - पुण्यात उद्याने सुरू
सात महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुणे शहरातील उद्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली. मात्र १० वर्षाखालील मुले व ज्येष्ठ नागरिकांना उद्यानात प्रवेश देण्यात येणार नाही.