पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी भोंग्यांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेने राज्यातील राजकारण हे चांगलच तापले आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्याबाबतीत घेतलेल्या भूमिकेने पुण्यात भोंग्यांच्या विक्रीत तब्बल 90 टक्के घट झाली ( loudspeaker Sales Decreased in Pune ) आहे.
भोंगे विक्रीत मोठी घट - पुण्यातील बुधवार पेठ परिसरात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक मार्केट असून या ठिकाणी वेगवेगळे इलेक्ट्रिक वस्तू विक्री केली जातात. यात भोंग्याची देखील विक्री केली जाते. राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेनंतर शहरातील मार्केटमध्ये भोंगे विक्रीत कमालीची घट झाली आहे. महिन्याला जे काही 20 ते 25 भोंग्याची विक्री होत होती ती आत्ता 5 ते 10 भोंगे विक्री होत आहे, अशी माहिती यावेळी विक्रेत्यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील नागरिक जास्त खरेदी करतात भोंगे - पुणे शहरात जी दुकाने आहेत. तिथे जास्त करून ग्रामीण भागातील नागरिक येऊन भोंगे खरेदी करत असतात. शहरातील नागरिकांना जास्त करून साउंडचा वापर होत असतो. त्यामुळे पुण्यात जास्त करून नागरिक साउंड खरेदी करतात तर ग्रामीण भागातील नागरिक हे जास्त करून भोंगे खरेदी करतात. पण आता राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्याने मोठ्या प्रमाणात विक्रीत घट झाली आहे.