पुणे - राज्यात सध्या कोरोना आटोक्यात आला असला तरी गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. राज्यात स्वाइन फ्ल्यूचा धोका अत्यंत वाढलेला आहे. स्वाइन फ्लूचा प्रसार वेगाने होऊ लागला असून जानेवारीपासून आत्तापर्यंत 173 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण ( 173 patients infected swine flu ) झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना आणि स्वाइन फ्ल्यू या आजाराची लक्षणे एकच असल्याने रुग्णाची कोरोना बरोबरच स्वाइन फ्ल्यूची देखील तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे ( State Survey Officer Dr Pradeep Awte ) यांनी दिली आहे.
पावसाळा सुरु होताच स्वाइन फ्ल्यूने डोके वर काढले. जुलैपासून सुरू झालेल्या या जोरदार पावसानंतर या आजाराचा संसर्ग वाढलेला दिसत आहे. गेल्या दहा दिवसांत स्वाइन फ्ल्यू १२६ रुग्ण आढळून आलेत. तर या आजाराच्या नियंत्रणासाठी सर्वेक्षण, प्रतिबंध व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, या ठिकाणी स्वाइन फ्ल्यू वाढत आहे. त्यामुळे कोविड हा सौम्य होत चालला आहे. कोविड आणि स्वाइन फ्ल्यू या आजाराच्या प्रतिबंधातमक उपाय एकच असून नागरिकांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे देखील यावेळी आवटे म्हणाले.
अशी आहे रुग्णांची स्थिती : महाराष्ट्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या आरोग्य विभागाच्या अहवालात, राज्यात H1N1 (स्वाइन फ्लू ) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे म्हटले आहे. या वर्षी २१ जुलैपर्यंत स्वाइन फ्लूचे १४२ बाधित झाले. तर आत्ता 173 रुग्ण झाले आहे. कोल्हापूरमध्ये तीन आणि पुणे, ठाण्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत स्वाइन फ्लूचे ४३ तर पुण्यात २३ आणि पालघरमध्ये २२ आहेत. नाशिकमध्ये १७ आणि नागपूर व कोल्हापूरमध्ये प्रत्येकी १४ तसेच ठाण्यात सात रुग्ण आहेत. स्वाइन फ्लू रुग्णांबाबत आम्ही लक्ष ठेवण्यासाठी योग्य ती कारवाई करत आहोत. त्यासाठी प्रतिबंध आणि नियंत्रण उपाय लागू केले जात आहेत, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली.
हेही वाचा - Nandurbar : गर्भवती महिलेचा वेदनेने विव्हळत असताना बांबुच्या झोळीत 3 तास जीवघेणा प्रवास