पुणे - अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने हात पसरायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानचा बहुतांशी प्रदेशावर त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अफगाणिस्तानचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यापीठातील वेगवेगळ्या कोर्सेसला विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत. यातील काही विद्यार्थी हे पुणे विद्यापीठातील वस्तीगृहात राहतात.
या विद्यार्थ्यांचे आई-वडील आणि कुटुंबीय अजूनही अफगाणिस्थानातच आहेत. आपल्या कुटुंबाच्या काळजीमुळे ही मुले भावनिक झाली आहेत. यातील काही विद्यार्थ्यांशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मागील अनेक दिवसांपासून आमचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकलेला नाही. आम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ नातेवाईक मित्र आणि देशवासीयांची काळजी वाटत आहे. काही विद्यार्थ्यांनी बोलताना त्यांना भारतात अधिक सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले. कारण अफगाणिस्तानमध्ये त्यांना बुरखा सक्ती आहे. परंतु भारतात मात्र त्यांना बिनधास्त राहता येतो. संपूर्ण चौक मदत करत असतानाच भारताकडून त्यांना मदतीची विशेष अपेक्षा आहे.
हेही वाचा - संकटकाळात भारताचा मदतीचा हात... अफगाणिस्तानी नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर