ETV Bharat / city

ईडी कार्यालयाच्या कार्यपद्धतीवर अ‌ॅड. सरोदेंची नाराजी

author img

By

Published : Jan 5, 2021, 6:41 PM IST

Updated : Jan 5, 2021, 7:05 PM IST

अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात ईडीला मदत करण्यासाठी आणि कागदपत्र गोळ्या करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला संबंधित कार्यालयात माध्यमकर्मी असल्याने राग आला आणि कागदपत्र न घेताच तो परत निघून गेला.

Sarode
Sarode

पुणे - एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहारप्रकरणी काही कागदपत्रे सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालयाला पाहिजे असल्याने अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात ईडीला मदत करण्यासाठी आणि कागदपत्र गोळ्या करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला संबंधित कार्यालयात माध्यमकर्मी असल्याने राग आला आणि कागदपत्र न घेताच तो परत निघून गेला.

ईडीचे अधिकारी पुण्यात येणार होते

एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी काही कागदपत्रे सक्तवसुली संचालनालयास (ईडी) कार्यालयाला पाहिजे असल्याने अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात ईडीचे अधिकारी येऊन कागदपत्र घेऊन जाणार होते. मात्र जो व्यक्ती अ‌ॅड. सरोदे यांच्या कार्यालयात आला होता, तो ईडीचा अधिकारी नव्हे, तर ईडीला मदत करण्यासाठी आला होता. सरोदे यांच्या कार्यालयात माध्यमकर्मी असल्याने कागदपत्र गोळा करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला राग आला आणि त्याने भूखंड व्यवहार प्रकरणातील कागदपत्र न घेताच परतला.

मी पहिलेच सांगितले होते - असीम सरोदे

एकनाथ खडसे यांच्या भूखंड व्यवहार प्रकरणी ईडी कार्यालयातून जो मला मेल आला होता, त्यात मी त्यांना सांगितले होते, की त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला कागदपत्र घेण्यासाठी पाठवावे, पण त्यांनी त्यांचा अधिकारी न पाठवता त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तीलाच पाठवले आणि आम्ही जे 1022 पानांचे झेरॉक्स केले होते, ते न घेताच आणि त्याचे पैसे न देताच रागात येऊन ती व्यक्ती निघून गेली आहे. ईडी कार्यालयाच्या अशा प्रकारच्या कार्यपद्धतीवर सरोदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 7:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.