ETV Bharat / city

Bhor Road Issue : मरणानंतरही स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी करावी लागते कसरत; रस्त्याअभावी गुडघाभर पाण्यातून काढली वाट - Bare Khurd village in Bhor tahsil of Pune

पुण्यातल्या भोर तालुक्यातील (Bare Khurd village) बारे खुर्द (Administration of Bhor Tahsil) गावातला,एक हृदय हेलावुन टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. जाण्यासाठी रस्ता नसल्याने, पावसाळ्यात अंत्यविधी साठी जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी जोर धरू लागलीय. मरणा नंतरही मृतदेहला यातना सहन कराव्या लागतं असल्याचा, हा व्हिडीओ सामोर आल्यानंतर, परिसरातील नागरिकांकडून हळहळ आणि संताप व्यक्त होतं आहे.

भोर तालुक्यातील बारे खुर्द गाव
भोर तालुक्यातील बारे खुर्द गाव
author img

By

Published : Jul 20, 2022, 5:29 PM IST

पुणे: पुण्यातल्या भोर तालुक्यातील (Bare Khurd village) बारे खुर्द (Administration of Bhor Tahsil) गावातला,एक हृदय हेलावुन टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. मागचे 10 दिवस भोर तालुक्यात मुसळधार पाऊसानं थैमान घातले होते. दोन दिवसापूर्वी बारे खुर्द गावातील 68 वर्षांच्या साहेबराव बदक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मात्र स्मशान भूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने, मुसळधार पावसात एक ते दीड किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत त्यांची अंतयात्रा काढावी लागली. संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्ता झाला नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात अंत्यविधी साठी जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याने, लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी मागणी जोर धरू लागलीय. मरणा नंतरही मृतदेहला यातना सहन कराव्या लागत असल्याचा, हा व्हिडीओ सामोर आल्यानंतर, परिसरातील नागरिकांकडून हळहळ आणि संताप व्यक्त होते आहे.

अंत्यविधी साठी स्मशान भूमीपर्यंत पाण्यातून चालत जातांना नागरिक

पुण्यातील घाटमार्गावर गेल्या अनेक दिवसापासून मुसळधार असा पाऊस पडतो आहे. त्यामुळे भोर भागांमध्ये पाणीच पाणी झालेले दिसते. वरील दोन्ही धरणांमध्ये हे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने विसर्ग ही होताना दिसते. परंतु त्या पावसामुळे भोर तालुक्यातील गाव खेड्यांमध्ये रस्ते नसल्याने नागरिकांना प्रचंड अशा त्रासाला सामोरे जावे लागते .

प्रशासनाकडे दुर्लक्ष : पुण्यातील भोर तालुक्यात बारे खुर्द गावामध्ये समशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याचा नसल्याने अंत्यविधीसाठी लोकांना गुडघाभर पाण्यामधून अंतयात्रा काढून जावे लागते . सर्व घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होताना दिसते. अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही इकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हेही वाचा : Maharashtra Monsoon Update : राज्यात पुन्हा एकदा 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढणार; विदर्भात जास्त पावसाची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.