ETV Bharat / city

Pune New Restrictions : डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पुन्हा निर्बंध; दुकाने चारपर्यंतच सुरू

पुणे महानगरपालिका हद्दीत लेव्हल ३ चे निर्बंध लागू झाले आहेत. त्यानुसार आता शहरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर, शनिवारी आणि रविवारी अत्यावशक सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

pmc
पुणे पालिका
author img

By

Published : Jun 26, 2021, 6:01 PM IST

Updated : Jun 26, 2021, 6:08 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात खबरदारी घेत नवे नियम जाहीर केले आहेत. त्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीत लेव्हल ३ चे निर्बंध लागू झाले आहेत. त्यानुसार आता शहरात सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. तर, शनिवारी आणि रविवारी अत्यावशक सोडून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. सोमवारी, २८ जूनपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिका आयुक्तांनी महापालिका हद्दीसाठी सुधारित आदेश पारित केले आहेत.

काय आहेत निर्बंध त्यावर नजर -

१) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा ( Essential Category ) मधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

२) अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने ( Non-Essential Shops ) सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

३) मॉल, सिनेमागृह (Single Screen and Multiplex) नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.

४) रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या ५०% क्षमते सुरु राहतील. दुपारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा ( Home Delivery ) रात्री ११ पर्यंत सुरु राहील.

५) लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा ( Airport Services), बंदरे सेवा ( Port Services ) यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

६) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ), खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.

७) सुट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा ( Exemption Category ) व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ( working days ) ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

८) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये ( Government Offices and Emergency Services required for Covid-19 Management) १००% क्षमतेने सुरु राहतील.

शासकीय कार्यालये ( अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ) ५०% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

९) सर्व आउटडोअर स्पोर्ट्स ( outdoor games) सर्व दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.

१०) सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी राहील.

११) पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.

१२) लग्र समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

१३) अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील.

१४) पुणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील.

१५) व्यायामशाळा ( Gym ), सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार ( by appointment) दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील. या ठिकाणी वातानुकूल ( A.C) सुविधा वापरता येणार नाही

Last Updated : Jun 26, 2021, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.