पुणे - भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सगळीकडचा राडारोडा काढून टाकण्याचे काम करत आहोत, असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना ( Aditya Thackeray on Kirit Somaiya ) टोला लगावला आहे. येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्य येथे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पहाणी करण्यासाठी आले होते. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार,पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,आदी मान्यवर उपस्थित होते.
किरीट सोमैय्यांवर आदित्य ठाकरे गेल्या दोन आठवड्यात दहा ते साडे दहा हजार टन डबरी काढण्यात आला -गेल्या महिन्यात पर्यावरण प्रेमी यांनी येरवडा येथील सलीम अली पक्षी अभयारण्य येथील प्रश्न समोर उपस्थित केला होता. त्यानंतर येथील पाहणीसाठी आज येथे आलो आहे. या ठिकाणी जो कचरा गोळा झाला होता. तो काढण्यात आला आहे. या परिसरातील पर्यावरण संवर्धनसाठी प्रयत्न केलं जातं आहे. गेल्या दोन आठवड्यात दहा ते साडे दहा हजार टन डबरी काढण्यात आला आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी स्वच्छतेसाठी पाऊल उचलून स्वच्छता मोहीम राबवावी, असं यावेळी ठाकरे म्हणाले.पुणे शहराची हिरवळ टिकवण्यासाठी काम सुरू आहे. येथील नाले तसेच स्वच्छता राखण्याचा देखील प्रयत्न केला जात असून यात सलीम अली पक्षी अभयारण्य येत आहे. तिथं सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. तसेच येथे जो काही राडारोडा टाकण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्यांच्याकडून राडारोडा टाकण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल आणि बिट मार्शलच्या मदतीने येथे लक्ष देखील ठेवण्यात येईल, असं देखील ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - India Corona Update: भारतात गेल्या 24 तासात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्णांची नोंद