पुणे - पिंपरी-चिंचवडमधील अभिनेत्री आर्या घारे हिने आपला वाढदिवस ( Actress Arya Ghare birthday ) चक्क स्मशानभूमीत साजरा केला आहे. याद्वारे घारे कुटुंबियांनी अंधश्रद्धेचा निषेध करत ( Denial of superstition ) नवीन विचारांला चालना दिली आहे . त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे. आर्या घारे हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक सतीश फुगे, संदीप राक्षे तसेच अथर्व शिंदे, नेहा वर्मा, दर्शन रानवडे, भगवान माने, काळुराम लांडगे, माऊली जावळकर, गणेश गवळी, रत्नेश शेवकरी, संतोष जांभुळकर आदी उपस्थित होते. आर्या हिने देऊळबंद, भिरगीट, अबक आणि बॅक टू स्कूल अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
ही संकल्पना आईला सुचली – आर्या घारे व , तिची आई वैशाली घारे या अंधश्रद्धा, रूढी परंपरा दूर सारण्यासाठी नेहमीच पुढे असतात. त्यामुळेच दरवर्षी आर्या हीच वाढदिवस अशाच अभिनव उपक्रमातून साजरा केला जातो. आज स्मशानभूमीत साजरा झालेला वाढदिवस हा देखील अशाच एका परिवर्तनवादाचा दृष्टिकोन असल्याचे आर्याची आई वैशाली घारे यांनी सांगितले. अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करावा ही संकल्पना आईला सुचली. दरवर्षी वेगळ्यापद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या आईचा मला अभिमान वाटतो. असे आर्या घारे यावेळी म्हणाली.
हेही वाचा : Chocolate Rakhi : यंदा भावासाठी घेऊया चॉकलेट राखी; पुण्यात 'येथे' मिळते ही राखी