पुणे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी woman throat slighting in Pimpari Chinchwad परिसरात एका 32 वर्षीय महिलेचा खून Pimpari Chinchwad business woman murder करण्यात आल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास दुकानात शिरून अज्ञात व्यक्तीने महिलेच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार करून खून केला आहे. आरोपी फरार असून भोसरी पोलीस Bhosari Police त्याचा शोध घेत आहेत. पूजा प्रसाद Pooja Prasad murder in Pimpari Chinchwad असे मृतक महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची बिहारमधील मुजफ्फरपूर मधील राहणारी होती. Pimpari Chinchwad Woman Murder
महिलेचा गळा चिरून आरोपी पसार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील लांडगे आळी परिसरात पूजा प्रसाद ही प्रगती कलेक्शन नावाचे दुकान गेल्या दोन वर्षांपासून चालवत होती. आज सकाळी एक अनोळखी व्यक्ती दुकानात शिरली आणि त्याने तिच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात महिलेने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत दुकानाच्या बाहेर पळत काढला. मात्र तिच्या मानेवर वार झाल्याने ती रस्त्यावर कोसळली. या घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी श्वान पथक देखील दाखल झाले होते.
हेही वाचा Kanashi Village भडगावच्या कनाशीत पाळला जातो 365 दिवस श्रावण मास