ETV Bharat / city

According to Meteorological Department : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुण्यात पावसाचा नवा रेकॉर्ड, दशकातला जुलै महिन्यातला सर्वाधिक पाऊस - हवामान खाते

महाराष्ट्रात पावसाने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता हवामान कोरडे असल्याचे पाहायला मिळाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुण्यात पावसाचा नवा रेकॉर्ड ( Rains in Pune City ), दशकातला जुलै महिन्यातला सर्वाधिक पाऊस पाहायला मिळाला. जुलैमध्ये पुण्यात सर्वाधिक पाऊस झाला. ( Pune IMD )

Dam Overflowed
धरण भरले तुडुंब
author img

By

Published : Aug 4, 2022, 12:25 PM IST

पुणे : पुणे शहरात पावसाने ( Rains in Pune City ) अनोखे रेकॉर्ड (Record) केले आहे. शहरात जुलैमध्ये 386.2 मिमी पावसाची नोंद झाली, जो 2012 नंतरचा जुलैमधील सर्वाधिक आहे. जुलैच्या सुरुवातीला सक्रिय मान्सूनची स्थिती आणि महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पाऊस यामुळे हा अनोखा विक्रम पुण्यात पावसाने (Heavy rain) केला आहे. हवामान विभागाने याविषयीची माहिती दिली. गेल्या दशकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस 2019 मध्ये जुलैमध्ये झाला होता. त्यावेळी 377 मिमी इतका पाऊस नोंदवला गेला होता. या महिन्यात 27 जुलैपासून दिवसाच्या तापमानातही प्रचंड वाढ झाली आहे, असे पुणे आयएमडीतर्फे (Pune IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी जुलैच्या सुरुवातीला सुरू झालेला पाऊस 15 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्यात आणि जोरदार बसरला. त्यामुळे पहिल्या आठवड्यातच खडकवासला धरणही भरले. मध्ये काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार बरसत यंदा नवेच रेकॉर्ड केले आहे.

मे आणि जूनमध्ये पावसाची कमतरता : भारतीय हवामान विभागाचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की पुण्यात जुलैच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मान्सूनपूर्व पाऊस चांगला नसल्यामुळे मे आणि जूनमध्ये पावसाची कमतरता होती. परंतु जुलैमध्ये मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे शहरातील पावसाच्या प्रमाणात त्यामुळे प्रचंड वाढ झाली, इतकी की त्याते रेकॉर्ड झाले आहे. आता जुलै महिन्यातच शहरात 386.2 मिमी पाऊस झाला आहे. हंगामी पावसाची तूटही यानिमित्ताने कमी झाली, असे कश्यपी म्हणाले.

येत्या काही दिवसांत हलका पाऊस : 1996पासून या वर्षी मासिक पाऊस दुसऱ्या क्रमांकावर आहे. 1996नंतर सर्वाधिक पाऊस 2016मध्ये 411.5 मिमी इतका नोंदवला गेला. जुलै 1907मध्ये मासिक पावसाची नोंद 508.5 मिमी होती. दरम्यान, पुणे शहरात येत्या काही दिवसांत हलका पाऊस सुरू राहील. ऑगस्ट सुरू होताच महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्येही अनेक भागांत एकाकी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे, असेगी अनुपम कश्यपी यांनी सांगितले. तर ऑगस्ट महिन्याचे पहिले तीन दिवस महाराष्ट्रातील कोणत्याही उपविभागासाठी कोणताही इशारा अद्याप देण्यात आलेला नाही.

  • *Raigad District (Talukawise RF) dt 4.8.2022(mm)*
    Pen - 7
    Mahsala - 7
    Mangaon - 3
    Uran - 10
    Shrivardhan - 4
    Khalapur - 5
    Roha -
    Poladpur - 14
    Murud - 10
    Sudhagad - 3
    Tala - 5
    Panvel - 3.6
    Matheran - 17.8
    Alibag - 22
    Mahad - 4
    Karjat - 1

    — K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा : शिंदे गट आणि शिवसेनेतील वादावर ८ ऑगस्टला होणार सुनावणी, निवडणूक आयोगाला 'हे' दिले सर्वोच्च निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.