पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) जाहीर केला आहे. यात शेतकरी तसेच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे. महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन येईल अशी घोषणा यावेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुले करण्यात आले असल्याचं जाहीर केले. पण या अर्थसंकल्पात उद्योग क्षेत्रासाठी कोणतीही भरीव तरतूद केली नाही. आजचा अर्थसंकल्प हा अपेक्षाभंग आणि खासगीकरणावर भर देणारा असल्याचे मत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंड्रस्ट्रीज असोसिएशनचे (Forum of Small Scale Industries Association) अध्यक्ष अभय भोर (Abhay Bhor) यांनी व्यक्त केले आहे.
काही निर्णय दिलासादायक -
आजच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती क्षेत्राला दिलेले प्राधान्य हा स्वागतार्ह निर्णय असून, कॉर्पोरेट टॅक्स 12 टक्क्यांवरून सात टक्के केला आहे, ते देखील एक दिलासादायक निर्णय आहे. तसेच रेल्वे प्रकल्प वाढवल्यामुळे उद्योगांना कामे देण्याची अपेक्षा असून, एकंदर आजचा अर्थसंकल्प हा निराशा देणारा आहे, असे देखील भोर यावेळी म्हणाले.
हेही वाचा - PM ON Union Budge 2022 : लोककल्याणकारी आणि विकसनशील अर्थसंकल्प - पंतप्रधान नरेंद्र मोदी