पुणे - आमचे नेते आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उद्यापासून तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे शिवसेनेला कोणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका ठिकाणी बोलताना तुमच्यात हिंमत असेल तर कोकणात येऊन दाखवा असे आव्हान शिवसेनेला केलं होतं. आता त्यांच्या या आव्हानाला वरुण सरदेसाई यांनी पुण्यात बोलताना उत्तर दिलं आहे.
विद्यापीठांच्या निवडणुकांसाठी युवासेना सज्ज - येत्या काही दिवसात राज्यातील सगळ्या विद्यापीठांमध्ये सिनेटच्या निवडणुका होणार आहेत . इतिहासात पहिल्यांदाच मुंबई विद्यापठात युवासेनेचे सिनेट सदस्य निवडूण आले होते. आता तीच कमाल आम्ही राज्यपालांच्या विद्यापीठात करणार आहोत असे सांगतानच वरुण सरदेसाई यांनी जसं शिवसेनेचं शिव संपर्क अभियान आहे तसेच युवासेना देखील राज्यभर पोहोचण्यासाठी सज्ज झाली आहे असल्याचं सांगितलं आहे .युवासेना ही गावं पातळीवर पोहोचली पाहिजे असा मानस युवा सेनेचा असल्याचे देखील वरुण सरदेसाई यांनी सांगितला आहे.
किरीट सोमय्या लोकांचं लक्ष विचलित करत आहेत - किरीट सोमय्या जे काही करत आहेत त्यात जनतेला बिलकुल रस नाही या उलट जनतेला दुसरे आणखीन प्रश्न सतावत आहेत. जनतेला महागाईची चिंता लागली आहे. केंद्रात तुमची सत्ता असताना देखील राज्यात बेरोजगारी आणि इंधनाचे दर हे वाढतच जात आहेत. आणि यावरून लक्ष विचलित करण्यासाठी किरीट सोमय्या असं काहीतरी करतात. पण आम्ही मात्र जनतेचा आक्रोश हा केंद्र सरकारपर्यंत पोहोचवू असं विधान वरुण सरदेसाई यांनी केल आहे. त्याचबरोबर पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर जे काही आरोप झाले आहेत त्याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास देखील वरुण सरदेसाई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.