ETV Bharat / city

Godman arrested Pune : मुलाला बरे करण्याच्या नावाखाली मांत्रिकाकडून मातेवर बलात्काराचा प्रयत्न - धनंजय गोहाड अटक पुणे

दिव्यांग मुलाचे आरोग्य चांगले करणे (Godman arrested pune ) आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता एका मांत्रिकाने विधी करत पीडित महिलेचा विनयभंग करून बलात्कार ( Godman news pune ) करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर ( Godman arrested for trying to rape women in pune ) पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत.

arrest
अटक
author img

By

Published : May 30, 2022, 12:42 PM IST

पुणे - दिव्यांग मुलाचे आरोग्य चांगले करणे (Godman arrested pune ) आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरिता एका मांत्रिकाने विधी करत पीडित महिलेचा विनयभंग करून बलात्कार ( Godman news pune ) करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर ( Godman arrested for trying to rape women in pune ) पोलिसांनी मांत्रिकाला बेड्या ठोकल्या आहेत. धनंजय गोहाड उर्फ नाना (रा.मांजरी बुद्रुक) असे मांत्रिकाचे नाव असून त्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे, तर शिष्या सुरेखा जमदाडे (रा.गंगा नगर, फुरसुंगी) ही फरार आहे.

हेही वाचा - Criticism of Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांची शरद पवार आणि रोहित पवारांवर कठोर टीका

ही घटना जानेवारी २०२१ ते २६ मे २०२२ दरम्यान घडली. याप्रकरणी मंत्रिकासह त्याला मदत करणाऱ्या महिला शिष्या विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा, विनयभंग व बलात्कार करण्याचा प्रयत्न, अपहार, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशी केली फसवणूक - याप्रकरणी पीडित छत्तीस वर्षीय महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला दिव्यांग मुलगा आहे. त्याचे आरोग्य चांगले करण्यासाठी आणि पतीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महिलेला सुरेखा जमदाडेनी मांत्रिक धनंजय गोहाड (नाना) याच्याशी भेट घालून दिली होती. तेव्हा मांत्रिकाने अनेक उपाय सांगितले आणि त्यानंतर फिर्यादीच्या विश्वासाचा गैर फायदा घेत एप्रिल २०२२ मध्ये घरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेच्या घरी येऊन विधी करावे लागेल, असे सागितले. तेव्हा मांत्रिकाने घरी जाऊन महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून आरोपी सुरेखा जमदाडे हिने रक्तचंदनामध्ये लिंबू पिळून तयार केलेला लेप महिलेच्या सर्व अंगाला लावला. यानंतर मांत्रिकाने पीडित महिलेचा विनयभंग करत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

मुलाचे आरोग्य चांगले व्हावे व पतीची आर्थिक परिस्थिती सुधारावी, तसेच त्यांच्यामधील नकारात्मक शक्ती निघून जावी यासाठी महिला ही आरोपीवर विश्वास ठेवून मांत्रिकाच्या सूचनेप्रमाणे सर्व करीत होती. त्यावेळी पतीला याबाबत काही सांगू नको, नाहीतर ते मरतील. तसेच, पहिल्या मुलाप्रमाणेच दुसरा मुलगा देखील दिव्यांग होईल आणि तुझा संसार उद्ध्वस्त होईल, भावाला सांगितले तर त्याचा अपघात होईल, अशी भीती मांत्रिकाने पीडित महिलेला घातली होती. मात्र, पीडित महिलेला मांत्रिक बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

काय काय करायला सांगितले - दिव्यांग मुलाला दर मंगळवारी कडूनिंबाच्या पाल्याने आंघोळ घालायची, अकरा सोमवार दूध भात एकत्र शिजवून त्याचे लेपन पिंडीला करायचे, मुलावर दर पौर्णिमेला नारळ लिंबू उतरून बाहेर टाकायचे व काळी भावली दरवाजाला बांधायची. तसेच शनिवारी दही, भात, उडीदाची काळी डाळ, गुलाल हे मुलाच्या अंगावर उतरून बाहेर टाकायचे, तसेच इतर उपाय मांत्रिकाने सांगितले.

भीती दाखवत विकृतीचा कळस - आरोपी जमदाडे याने फिर्यादी महिलेच्या मोबाईलच्या व्हॉट्सअॅपवर मॅसेज करून त्याचे वीर्य किती शक्तिशाली आहे. ते शरीरात घे म्हणत अमृत म्हणून प्राशन कर असे मेसेज पाठवून नंतर ते फोटो डिलिट करण्यास सांगितले. याबाबत कोणाला सांगितल्यास घरच्यांचा मृत्यू होईल, अशी भीती दाखवत विकृतीचा कळस गाठला.

हेही वाचा - Rupali Chakankar : 'चंद्रकांत दादा ! यापुढे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू नये, याची काळजी घ्या'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.