ETV Bharat / city

बारामतीत बनावट रेमडेसिवीर प्रकरणात एका डॉक्टरचाही समावेश

author img

By

Published : May 26, 2021, 11:17 PM IST

बनावट रेमडेसिवीर बनवणाऱ्या टोळीला नुकतीच बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील एका डॉक्टरचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

बनावट रेमडेसिवीर प्रकरण
बनावट रेमडेसिवीर प्रकरण

बारामती - बनावट रेमडेसिवीर बनवणाऱ्या टोळीला नुकतीच बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील एका डॉक्टरचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. स्वप्निल अंकुश नरुटे (वय २९, रा. काझड, ता. इंदापूर) असे या डॉक्टरचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बारामतीत बनावट रेमडेसिवीर प्रकरणात एका डॉक्टरचाही समावेश

गेल्या महिन्यात बनावट रेमडेसिवीर बनवणारी टोळी जेरबंद

हा डॉक्टर बनावट रेमडेसिवीर बनवणाऱ्या टोळीकडून इंजेक्शन घेत ती विकण्याच्या बदल्यात तीन हजार रुपयांचे कमिशन घेत होता. कमिशन पोटी त्याने घेतलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. गेल्या महिन्यात बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन तयार करत ती विकणारी टोळी जेरबंद केली होती. या प्रकरणात काटेवाडीजवळील मासाळवाडी येथील दिलीप ज्ञानदेव गायकवाड यांच्यासह प्रशांत घरत (रा. भवानीनगर), शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. कसबा, बारामती), दयानंद उद्धव गोसावी व कृष्णा शशीराव जेवाडे (रा. जवाहरनगर, इंदापूर रोड, बारामती) यांच्यासह डाॅ. स्वप्निल नरुटे व एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

30 ते 35 हजारांना विकायचे एक इंजेक्शन

कोरोना संकट काळात रेमडेसिवीरची मोठ्या प्रमाणात मागणी असताना पुरवठा मात्र नगण्य होत होता. याचा गैरफायदा घेऊन या टोळीने पॅरासिटेमॉल गोळ्यांचे पाणी तयार करत ते कुप्पीत भरून विकण्याचा धंदा सुरु केला होता. 30 ते 35 हजारांना एक इंजेक्शन विकले जात होते. या बनावट इंजेक्शनमुळे पवारवाडी (ता. फलटण) येथील स्वप्निल जाधव या कोरोनाबाधिताला आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या टोळीविरोधात यापूर्वी सदोष मनुष्यवधासह अन्य कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये डाॅक्टरचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

हेही वाचा - मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर; 1362 नवे रुग्ण, 34 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.