पुणे - महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये आतापर्यंत ७५ कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात सर्वजण निगेटिव्ह आहेत. महापालिकेकडून कोरोनासाठी सहा बेड तयार करण्यात आले आहेत.
आज(बुधवार) दुपारी चार इटली व अमेरिकेवरून आलेल्या प्रवाशांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल केले आहेत. खबरदारी म्हणून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मास्क देण्यात आले आहेत. सध्या नायडू रुग्णालयामध्ये ६, ससूनमध्ये ८, खासगी रुग्णालयामध्ये ३० अशा कोरोना संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
काळजी घ्या -
कोरोनाबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे त्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. सर्दी, खोकला येत असेल त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
हेही वाचा -
कोरोना व्हायरस: दिल्लीत मास्कचा तुटवडा, मागणी वाढल्याने काळाबाजार सुरू
महाराष्ट्रात कोरोनाचा एकही लागण झालेला रुग्ण आढळला नाही - राजेश टोपे