मुंबई - कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आज देशाचा 74वा स्वातंत्र्यदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी साध्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सामजिक अंतर राखत ध्वजारोहण करण्यात आले. तर राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील फक्त ५ शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले आहे.
पुणे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
नागपूर - विभागीय आयुक्त कार्यालयात नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पोलीस दलातील पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांना मेडल देऊन सन्मान केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे यावर्षी संघ मुख्यालयामध्ये कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. अत्यंत साध्या पद्धतीने ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवडक ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारक उपस्थित होते. यानंतर सीआयएसएफ आणि पोलिसांच्या पथकाने सलामी दिली.
नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. सोशल डिस्टन्सच्या नियमांचे तंतोतंत पालन करत ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला, त्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष झालेले आहे. त्यामुळे सोशल डिस्टनचे नियमाचे पालन करून, जिल्हाधिकारी कार्यालयात शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा पालकमंत्र्याच्या हस्ते गौरव करण्यात आला.
लातूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मात्र, अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांनी हा कार्यक्रम संपवला. नागरिकांनी गर्दी करू नये, तसेच घरी बसून हा कार्यक्रम पाहता यावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फेसबूक पेजवरून कार्यक्रमाचे प्रेक्षपण करण्यात आले होते. तर जिल्हाभरातील शाळांमध्ये सुद्धा फक्त ५ शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडले.
सांगली - राज्याचे जलसंपदा तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी सांगली पोलीस दलाच्या वतीने संचलन करत मानवंदना देण्यात आली. तसेच यावेळी मंत्री पाटील यांच्याहस्ते जिल्हा क्रीडा व युवा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
भोकरदन (जालना) - भोकरदन नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, अधीक्षक वामन आडे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी यांच्यासह नगरसेवक, न प कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, तहसिल कार्यालयात तहसीलदार संतोष गोरड तर जवळपास सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालयात त्या त्या विभाग प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
धुळे - जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. सत्तार यांनी जिल्हावासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत, कोरोनाच्या वैश्विक संकटाला सामोरे जातांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील ओरोस येथील पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील कोविड योद्धे म्हणून चांगली कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम व इतर अधीकारी उपस्थित होते.
गोंदिया - गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षी ध्वजारोहण गोंदिया जिल्हा पोलीस मुख्यालय कारंजा येथे होत असते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभाव असल्यामुळे गोंदिया जिल्हा अधिकारी कार्यालय येथे सोशल डिस्टिंग बघता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व स्वातंत्र सैनानी सहसन्माननीय व्यक्ती कोरोना योद्धे उपस्थित होते, यावेळी पालक मंत्री देशमुख यांनी जिल्ह्याच्या विकासाकरिता शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देत जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
रायगड - अलिबाग पोलीस परेड मैदानावर पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोना संकटामुळे मुख्य ध्वजरोहण कार्यक्रम नागरिकांना पाहण्यासाठी यावेळी फेसबुक लाईव्हची सुविधा जिल्हा प्रशासनाने केली होती. ध्वजरोहण सोहळा संपन्न झाल्यानंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक संस्था, पत्रकार यांचा पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अहमदनगर - महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या दुर्गम भागात जाऊन ध्वजारोहण केले. संगमनेर तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिह्रेवाडी येथील जिल्हा परिषेद शाळेत त्यांनी ध्वजारोहण केले. जिल्ह्याच्या मुख्यालयी पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र, बाळासाहेब थोरातांकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नसल्यामुळे त्यांनी संगमनेर मतदार संघातील मुख्यालयात स्वातंत्र दिन साजरा न करता ग्रामीण भागातील एका छोट्याश्या गावात जावून ध्वजारोहण केले आहे.
तर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या लोणी गावातील ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहण केले. तर शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
जालना - राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य प्रशासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले आदिंची उपस्थिती होती.
नाशिक - पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात 73वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा वाढत असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण मोठे असून आपण कोरोनायोद्धांना सलामकरून आपण सर्व कोरोना मुक्त होण्याचा संकल्प करू असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले आहे.
जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा शक्य ते प्रयत्न करत आहे. जनतेने देखील कोरोनाच्या या लढ्यात जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हास्तरीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, वीरमाता आदी उपस्थित होते.
रत्नागिरी - 'रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आलं. या आपत्तीच्या स्थितीत शासन खंबीरपणे उभं आहे आणि या संकटावर मात करुन जिल्हा नव्याने उभा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा.' असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी आज रत्नागिरीत केले. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज त्यांच्या हस्ते पार पडला. रत्नागिरीतील पोलीस परेड ग्राऊंडवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दूमती जाकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळयास जि.प. अध्यक्ष रोहण बने, सभापती बाबू म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडयाशेट साळवी तसेच जि.प. सदस्य आणि नगरसेवकांचीही उपस्थिती होती.
वर्धा - जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचा कामाचा वेग मंदावला. पण शेतकऱ्याने आपली पेरणीचे कामे पूर्ण केली. कोरोनाचे संकट असले तरी शेतकऱ्यांनी शेतात राबून केलेले काम अनेक सुशिक्षतांना जाण आणि कर्त्यवाची शिकवण देणारे आहे. त्यांच्या या कामाला सलाम असल्याचे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे उपस्थित होते.
अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वणी ममदापुर या गावातील सरपंचाने समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. कोरोना काळात आरोग्य सेवा देणाऱ्या गावातील एका आशा सेविकेला तिच्या सन्मानार्थ ध्वजारोहनाचा मान देण्यात आला आहे. मुकुंद पुनसे असे या सरपंचाचे नाव असून त्यांनी गावातील आशा सेविका रंजना लवनकर यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला. त्यांचा हा उपक्रम महाराष्ट्राला आदर्श ठरणारा आहे.
कोल्हापूर - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक अंतर ठेवत कोल्हापूरातील आपल्या निवासस्थानी ध्वजावंदन केले. यावेळी त्यांच्या पत्नी अंजली पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पंचगंगा बँकेचे संचालक राहूल भोसले, भाजपा उपाध्यक्ष विजय आगरवाल, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, कृष्णात आतवाडकर, कृष्णा सुर्यवंशी, मोहन मेने, महादेव कडूकर, अनिल चोरगे आदी उपस्थीत होते.
राजू शेट्टींनी स्वाभिमानी दुध संघात स्वातंत्र्य दिन साजरा केला. गतवर्षी महापुरात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य जनतेला महापुरातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या एन.डी.आर.एफच्या जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि सावकर मादनाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस ग्राउंड ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते कोरोना योद्धे, पोलीस विभागातील विशेष पथक मिळाल्या लोकांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री आणि खासदार यांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रमही पार पडले.
अकोला - कोरोना हे देशावरच नव्हे तर जगावर आलेले संकट आहे. हे संकट दूर करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. त्या विश्वसातून आपण संकटांवर मात करू, असा विश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यासह आदी उपस्थित होते.
सोलापूर - स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मंगळवेढा (सोलापूर) - शहीद पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करत 74 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या गावात शहीद जवानाची पत्नी कविता म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
परभणी - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते अत्यंत साधेपणाने व मोजक्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, जिल्हा परिषद अध्यक्ष लक्ष्मीबाई विटेकर, महापौर संगीता सोनकांबळे, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, जिल्हा परिषदेचे सीईओ पृथ्वीराज बी.पी., उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नंदुरबार - मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत योग्य काळजी घेत, हा सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाणे - मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तहसीलदार आदिक पाटील ,खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, संजय केळकर, पोलीस आयुक्त विवेक फंनसळकर, ग्रामीण अधिक्षक शिवाजी राठोड व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सेवादल प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण, मुंबई विभागीय विद्यार्थी अध्यक्ष अमोल मातेले, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर आदींसह पक्षाचे मुंबई व प्रदेशचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाशिम - पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वाशिम येथे ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमीत झनक, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडकसह अधिकारी उपस्थित होते.
नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सकाळी मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इंटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सातारा - कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे तसेच सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावतीने जनतेसाठी शुभसंदेशाचे वाचन केले. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपपोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.
बीड - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाला.
याप्रसंगी बीड पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. समारंभाला आ. संदीप क्षीरसागर, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या सह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवर शहीद कुटुंबीय यांची भेट घेऊन पालकमंत्री मुंडे यांनी