पुणे - पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आज कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढ झालेली दिसत आहे. त्याच्यामुळे कोरोनाची तिसरी लाट पुण्यात आल्याचे बोलले जात आहे. पुण्यात आज दिवसभरात 7 हजार 264 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात सहा हजारापेक्षा जास्त रुग्ण संख्या यांची नोंद दिवसागणिक वाढत आहे मात्र कोणाची साथ सुरू झाल्यापासून आजच्या दिवसाचा आकडा हा सर्वात जास्त मानला जात आहे.
यापूर्वी आठ एप्रिल दोन हजार एकोणवीस मध्ये 7010 रुग्णांची नोंद झाली होती मात्र आजची नोंद त्यापेक्षा जास्त असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव वावरे यांनी दिली आहे. पुणे शहरात आजपर्यंत पाच लाख 80 हजार 533 कोरोना रुग्ण आहेत आशरात 4 हजार 575 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आजपर्यंत 5 लाख 32हजार 101 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये सात शहरी तर चार ग्रामीण रुग्णांचा समावेश आहे त्यामुळे पुण्यात आत्तापर्यंत 9 168 रुग्णांचा धोरणामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पुण्यात अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ
पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन लसीकरण झाल्यानंतर देखील कोरोनाची लागण होत आहे. पुणे शहरामध्ये सध्या 42 हजार 264 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 282 रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. शहरातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांपैकी 3.40 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 20 हजार 342 तपासणी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 41 लाख 79 हजार 767 तपासणी करण्यात आलेल्या आहेत.