ETV Bharat / city

पुणे शहराच्या सुरक्षेची भिस्त अवघ्या १४ अग्निशमन केंद्रांवर, सुरक्षेच्या दृष्टीने किमान ७२ केंद्रांची आवश्यकता - अग्निशमन केंद्र पुणे ईटीव्ही भारत

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरिकरण झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान ७२ अग्निशमन केंद्रे कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या शहरात केवळ १४ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत आणि तेथे कार्यरत जवानांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने आणखी केंद्रे उभारण्याची आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

only 14 fire stations in pune
अग्निशमन
author img

By

Published : Dec 4, 2021, 5:34 AM IST

पुणे - पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. नागरिकरण झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किमान ७२ अग्निशमन केंद्रे कार्यरत असणे गरजेचे आहे. परंतु, सध्या शहरात केवळ १४ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत आणि तेथे कार्यरत जवानांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याने आणखी केंद्रे उभारण्याची आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मनुष्यबळाची कमतरता, हा अग्निशामक दलाचा चिंतेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा - devendra fadnavis on pune - पुण्यात पुन्हा सत्ता आल्यावर ते देशात क्रमांक एकचे शहर बनवू - देवेंद्र फडणवीस

आगीच्या घटनांमध्ये वाढ

सध्या पुणे शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे, शहराच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या तरतुदी देखील वाढवणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे शहर वाढत आहे. त्याप्रमाणे आगीच्या घटना देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. या आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलातील जवानांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे.

७२ अग्निशमन केंद्र सुरू करण्याची गरज

शहराचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने जो आराखडा तयार झाला आहे, त्यानुसार शहरामध्ये एकूण ७२ अग्निशमन केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. असे असतानादेखील शहरात केवळ १४ अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. नवीन गावांच्या समावेशानंतर भविष्यात धोक्याची संख्याही वाढणार आहे. हे धोके कमी करण्यासाठी अग्निशमन दल महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, हेच अग्निशमन दल सक्षम नसल्याचे दिसत आहे. अपुऱ्या अग्निशमन केंद्रांबरोबर केंद्रावर पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. २०११ - १२ पासून अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. सध्या शहरात उपलब्ध असणाऱ्या १४ केंद्रांवर केवळ ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत, असे पुणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.

मनुष्यबळ अभावी तीन केंद्रे सुरू नाही

शहरातील खराडी, वडगाव शेरी आणि विमाननगर या भागात एकही अग्निशमन केंद्र नाही. खराडी, महंमदवाडी, नांदेड सिटी, चांदणी चौक कोथरूड येथील बांधकाम चालू झाले आहे. तर, शहरातील तीन ठिकाणचे अग्निशमन केंद्रांच्या इमारतीचे काम पूर्ण झाले असले तरी, मनुष्यबळ अभावी ही केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. गंगाधाम, धानोरी, काळेपडळ हे तिन्ही स्टेशन बांधून तयार आहेत. मात्र, मनुष्यबळ अभावी ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाहीत.

५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

सध्या पुणे शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या १४ अग्निशमन केंद्रांवर ९१० कर्मचारी कार्यरत असणे गरजेचे आहे. मात्र, सध्या या केंद्रांवर ३८३ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे, तब्बल ५२७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे, ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

मान्यते अभावी भरती रखडली

अग्निशमन केंद्रांमध्ये नव्याने भरती करण्याबाबत रिक्रुटमेंट रूलसाठी (आर.आर.) लागणाऱ्या सर्व पात्रता शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप रिक्रुटमेंट रूल मान्य करण्यात न आल्याने नव्याने भरती करता येत नाही. तसेच, या रिक्रुटमेंट रूलमध्ये बढतीबाबतचे स्तरदेखील सांगण्यात आले आहेत. मात्र, रूल अद्याप मान्य नसल्याने बढतीची प्रक्रियादेखील रखडलेली आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

हेही वाचा - Ashok Saraf felicitated at PIFF : मराठी लोकांना जेवढी कॉमेडी कळते तेवढी कोणालाच कळत नाही - अशोक सराफ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.