ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या काळात पुण्यात सात खून - पुणे गुन्हेगारी बातमी

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील वर्दळ वाढली आणि त्याचे परिणाम म्हणून गुन्हेगारी कारवायातही वाढ झाली. मागील बारा तासात तर येरवडा आणि हडपसर परिसरात दोघांचे खून झालेत.

murder news
लॉकडाऊनच्या काळात पुण्यात सात खून
author img

By

Published : May 27, 2020, 10:27 AM IST

पुणे - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन केल्यानंतर त्याचा परिणाम गुन्हेगारी घटनांवर झाला. एप्रिल महिन्यात पुण्यातील गुन्हे जवळपास थंडावले होते. परंतु एक मे पासून म्हणजे लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण लॉकडाऊनच्या या काळात खुनाच्या सात घटना घडल्या आहेत.

लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शहरातील वर्दळ वाढली आणि त्याचे परिणाम म्हणून गुन्हेगारी कारवायातही वाढ झाली. मागील बारा तासात तर येरवडा आणि हडपसर परिसरात दोघांचे खून झालेत.

murder news
शोएब शेख

लॉकडाऊन काळातील सात खून

25 मे

येरवड्यातील पंचशील नगर भागात केटरिंग व्यावसायिक असलेल्या प्रतीक हनुमंत वन्नळे (वय 23) या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

25 मे

हडपसर परिसरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड बसवराज कांबळे (वय 23) याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. बसवराज हा एका ग्रुपचा अध्यक्ष होता. अनेक गुन्हेगारी कारवाईत त्याचा सहभाग होता. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीयुद्धातून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते.

22 मे

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेकराईनगर परिसरात शोएब शेख (वय 19) या सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.

16 मे

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने भोसकून पत्नीचा खून केला. वृषाली संतोष चुरगुडे (वय 29) असे मृत महिलेचे नाव आहे. सिंहगड पोलिसांनी पतीला अटक केली.

4 मे

सिंहगड रस्ता परिसरातील तुकाईनगर भागात मोना मदने (वय 36) या महिलेचा खून झाला. अवैध धंद्याबद्दल पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून हा खून झाला. सिंहगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

29 एप्रिल

जुना बाजार परिसरातील संगमघाट येथे वाहनांच्या पार्कींगमध्ये झोपलेल्या मंगेश विष्णू कांबळे (वय 25) या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. बंडगार्डन पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

21 एप्रिल

येरवडा कारागृरातून जामिनावर सुटून आलेल्या मुन्ना चव्हाण (वय 23) याची पुणे स्टेशन परिसरात हत्या. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाला. बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.