पुणे - शहरातील उंड्री परिसरातून सहा परदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 69 लाख रुपये किंमतीचे कोकेन आणि मॅफेड्रोन जप्त केले आहे.
आरोपींची नावे
मनफ्रेंड दाऊद मंडा (वय 30), अनास्ताझिया डेव्हिड (वय 26), हसन अली काशीद (वय 32) बेका हमीस फाऊमी (वय 42, सर्व रा. टांझानिया), शामिम नन्दावुला (वय 30), पर्सि नाईगा (वय 25, दोघेही रा. युगांडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
घरातून चोरून विक्री
या प्रकरणी अधिक माहिती अशी, की अमली पदार्थविरोधी पथकाचे कर्मचारी मनोज साळुंखे यांना पाच ते सहा परदेशी व्यक्ती उंड्री येथील आतूर हिल्स सोसायटीतील रो हाऊसमध्ये राहत असून घरातून चोरून कोकेन मॅफेड्रोन, ड्रग्सची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पोलिसांनी याठिकाणाहून 136 ग्राम कोकेन (9, 57, 600), 1 किलो 151 ग्राम मॅफेड्रोन (57, 55, 000) याशिवाय मोबाइल फोन, वजन काटे, बॉटल्स असा एकूण 68 लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेले आरोपी मागील 4 वर्षांपासून पुण्यात राहत असून मेडिकल, स्टुडंट व्हिसावर पुण्यात आले आहेत. त्यांनी हे मेफेड्रोन कुठून आणले, कुणाला विकणार होते याचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर करीत आहेत.