ETV Bharat / city

Missing From Pune : पुण्यातून 11 महिण्यात ५६७ मुले मुली बेपत्ता - Persistent insults

कधी लग्नाचे, कधी चांगल्या कामाचे, नौकरीचे आमिष (The lure of a job) दाखविले, किंवा घरात होणारी मारहाण (Beatings at home) तसेच सातत्याने होणारा अपमान (Persistent insults) तसेच घरात कोणी समजून घेत नाही, अशा विविध कारणामुळे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून जानेवारी ते नोव्हेंबर या 11 महिण्याच्या कालावधित तब्बल ५६७ मुले मुली घरातून पळून गेली (The boys and girls ran away from home) आहेत.

Missing From Pune
पुण्यातून मुले मुली बेपत्ता
author img

By

Published : Dec 27, 2021, 3:23 PM IST

पुणे: वयात आलेल्या मुलींच्या सुरक्षेच्या काळजीने आईवडिल तिच्यावर काही बंधने घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावरुन घरात छोटेमोठे खटके उडतात. घरात आपले कोणी ऐकत नाही, असा समज करुन घेऊन मुली अनेकदा बाहेरच्यांच्या बोलण्याला भुलतात. त्यांना अनेक वेळा कधी लग्नाचे, कधी चांगल्या कामाचे तसेच नोकरीचे आमिष (The lure of a job) दिलेले असते. त्यातून आतापेक्षा अधिक चांगले जीवन जगण्याच्या अपेक्षेने अनेक मुली घर सोडून पळून जात आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. शाळा बंद असल्या तरी अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल आला. त्यातून चॅटिंग फेसबुकवर अनोळखी मुलींबरोबर ओळख वाढू लागली. मुला त्यातून आमिषे दाखविली जाऊ लागली. त्यात घरात आईवडिलांकडून येणारा दबाव, त्यातून होणारी धुसफूस त्यामुळे दाखविलेली स्वप्ने, प्रेमाच्या आणाभाका अन् लग्नाचे आमिष यामुळे अल्पवयीन मुलींनी घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे असे मानसोपचार तज्ञ डॉक्टर निकेत कासार सांगतात.

पालकांच्या दुर्लक्षामुळे घटनांमध्ये वाढ
नोकरी आणि व्यवसायासाठी पालक कामासाठी बाहेर पडतात. मात्र, त्यांना मुले काय करतात, याकडे त्यांचे लक्ष नसते. पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे कामावरून आल्यानंतर सतत मुलांवर ओरणे, चिडचिड करणे या कारणांमुळे मुले पालकांपासून दूर जातात. त्यामुळे मुलांना पालकांकडे मन मोकळे करता येत नसल्याचे दिसून आले आहे. पालकांनी चाणाक्षपणे लक्ष ठेवल्यास अल्पवयीन मुली घरातून पळून जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. प्रत्यक्षात मात्र, शाळा, महाविद्यालय, प्रवासादरम्यान अनेकांकडून मुलींचा पाठलाग करणे, त्यांना त्रास देणे, छेडछाड केल्याच्या घटना घडत आहेत. परंतु, बदनामी टाळण्यासाठी मुलींकडून मुकपणे अन्याय सहन केल्याचेही दिसून आले आहे.

१२५ मुले-मुली अजूनही बेपत्ता
पुणे शहरातून जानेवारी ते नोव्हेंबर या काळात ५६७ मुले मुली घरातून पळून गेली (The boys and girls ran away from home) . त्यापैकी ४५२ मुले-मुली सापडले आहेत. मात्र १२५ मुले-मुली अजूनही सापडले नाही. ही मुले कोठे गेली याचा पोलीस शोध घेत आहेत.

अल्पवयीन मुलींना फूस लावून नेले

वर्ष अल्पवयीन मुली
2017 446

2018 461

2019 311

2020 338

2021 376 ( नोव्हेंबर अखेर)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.