ETV Bharat / city

बापरे.! सुमारे 51 टक्के पुणेकरांना नकळत होऊन गेलाय कोरोना, 'या' सर्वेतून समोर आली बाब

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील नागरिकांमध्येच आता कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे सेरोलॉजिकल सर्वेक्षणातुन समोर आले आहे. इंडियन इनस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.

corona
कोरोना
author img

By

Published : Aug 17, 2020, 10:06 PM IST

पुणे - कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यातील नागरिकांमध्येच आता कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे सेरोलॉजिकल सर्वेक्षणातुन समोर आले आहे. इंडियन इनस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च या संस्थेने 20 जुलै ते पाच ऑगस्ट या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.

पुण्यातील येरवडा, कसबा पेठ- विश्रामबाग, रास्ता पेठ- रविवार पेठ, लोहिया नगर- कासेवाडी, नवीपेठ- पर्वती या भागातील 1 हजार 664 नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे या भागातील 51.05 नागरिकांमधे कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या अ‌ँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

डॉ. आरती नगरकर (आरोग्य विभाग प्रमुख - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - महाराष्ट्र ठरतोय कोरोना मृत्यूची राजधानी! देशापेक्षा राज्याचा मृत्यूदर दीड पटीने अधिक

कोरोनाची बाधा होण्यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव दिसून येत नाही. 52.8 पुरुषांना तर 50.1 महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 66 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे 32.6 टक्के आहे तर सर्वाधिक प्रमाण हे 51 ते 65 वयोगटातील लोकांमध्ये आहे. जे प्रमाण 50.0 टक्के इतके आहे.

कोरोनाचा सर्वाधिक 56 टक्के ते 62 टक्के फैलाव हा चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे. सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वाधिक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.