ETV Bharat / city

दगडूशेठ गणपतीला ५०१ फळांचा नैवेद्य, मंदिरात फळे, फुलांची मांडली आरास

सध्या दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद आहे. मात्र मंदिरात दैनंदिन आरती सुरू आहे. दगडूशेठ गणपतीला ५०१ फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. यात संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी फळांचा समावेश आहे.

Pune
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे
author img

By

Published : May 26, 2020, 3:09 PM IST

पुणे - दगडूशेठ गणपतीला ५०१ फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. यात संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी फळांचा समावेश आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात हा ५०१ फळांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे फळे व फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुणे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद आहे. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त मंदिरात गणेशयाग देखील झाला. फळे व फुलांच्या आकर्षक सजावटीसोबतच गणेशाला फुलांचा पोशाख देखील करण्यात आला. त्यामध्ये मुकुट, अंगरखा, शुंडाभूषण यासह विविध अलंकार फुलांमध्ये साकारण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.