ETV Bharat / city

Sant Tukaram Maharaj Temple : तुकोबारायांच्या वयावरून साकारले 42 फूट उंच मंदिर; 42 दिवसांत तयार केली 42 इंच मूर्ती

देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा ( Dedication ceremony Shila temple ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते पार पडला. हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर चला जाणुन घेऊया शिळा मंदिराबद्दल. या मंदिराची उंची 42 फूट आहे. तसेच मंदिरातील जगतगुरू संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. देशामध्ये सध्या उंचच उंच मूर्ती, पुतळे उभे करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या परिस्थितीत तुकोबारायांची मूर्ती मात्र 42 इंचाची ठेवून हा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 42 ह्या आकड्यालाही वेगळा संदर्भ आहे, तो असा की, जगदगुरू तुकाराम महाराजांचं वय 42 वर्षांचंच होतं.

Tukaram Maharaj
तुकाराम महाराज
author img

By

Published : Jun 14, 2022, 3:37 PM IST

Updated : Jun 14, 2022, 5:26 PM IST

पुणे - देहूतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा ( Dedication ceremony Shila temple ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांच्या हस्ते पार पडला. हे शिळा मंदिर नेमके कसे आहे? अशी उत्सुकता अनेकांना लागली आहे. तर चला जाणुन घेऊया शिळा मंदिराबद्दल. या मंदिराची उंची 42 फूट आहे. तसेच मंदिरातील जगतगुरू संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj ) यांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. देशामध्ये सध्या उंचच उंच मूर्ती, पुतळे उभे करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. या परिस्थितीत तुकोबारायांची मूर्ती मात्र 42 इंचाची ठेवून हा वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 42 ह्या आकड्यालाही वेगळा संदर्भ आहे, तो असा की, जगदगुरू तुकाराम महाराजांचं वय 42 वर्षांचंच होतं.

शिळा मंदिरातच संत तुकाराम महाराजांची पहिली मूर्ती अन 36 कळस - मंदिरात स्थापन केलेल्या दगडाचे तुळशी वृंदावन आहे. पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती आणि मंदिरावर कळस नव्हता. त्या शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच सुबक मूर्ती आहे. तर मंदिरावर 36 कळस स्थापन करण्यात आले आहेत. संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे. शिळा मंदिरातील संत तुकोबांच्या मूर्तीची उंची 42 इंच आहे. संत तुकोबांची काळ्या पाषाणातील ही मूर्ती बरोबर 42 दिवसांमध्ये उभारली आहे. ही मूर्ती पिंपरी चिंचवडचे शिल्पकार चेतन हिंगे यांनी तयार केली आहे.

शिळा मंदिर कसं आहे - सर्वोदय भारत शिल्पकला कन्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला हे मंदिर उभारणीचं काम देण्यात आलं होतं. मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे आहे. अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. मंदिराची उंची 42 फूट आहे. यासाठी एकूण खर्च हा 1 कोटी 17 लाख 47 हजार 500 रुपये आला आहे.

हेमाडपंथी मंदिर - हे मंदिर पूर्ण दगडात बांधले आहे. याची उंची साधारणपणे 42 फूटांपर्यंत आहे. हेमाडपंथी हे मंदिर आहे. आपल्या वातावरणाला सूट होतील, असे दगड वापरण्यात आले आहेत. तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरल्या आणि वर आल्या. तोपर्यंत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही आणि 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर ( दगडावर) बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे. म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते.

नारायण महाराजांनी आनंदडोह येथून शिळा आणली - जगद्गुरू तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज आणि सर्व वारकऱ्यांनी जेव्हा तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाले. त्यानंतर आनंदडोह येथून शिळा म्हणजेच हा दगड आणला. त्या शिळेची पूजा केली. ही शिळा या ठिकाणी स्थापन झाल्यापासून सर्व वारकरी संप्रदाय आणि संस्थान या ठिकाणी पूजा करून महाराजांना यात पाहात होते.

शिळेवर तुकोबारायांचे चरण स्पर्श - देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे म्हणाले की, जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथा पाण्यावर तरल्या. त्या कालावधीत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न, पाणी सोडून अनुष्ठानसाठी बसले होते. भगवंतांच्या कृपेने अभंगगाथा दगडासह वर आल्या आणि तुकोबारायांनी अनुष्ठान सोडले. ज्या शिळेवर तुकोबारायांचे चरण स्पर्श झाले ( Tukobara shoes rock ) होते, ती शिळा भाविकांच्या दर्शनासाठी देहू मंदिरात आणून ठेवली होती. त्या शिळेवर भव्यदिव्य मंदिर असावं असा वारकरी संप्रदायाचा ( Warkari sect ) आग्रह होता.

प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन - दरम्यान, 2008 साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ( former President Pratibhatai Patil) यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात 2015 -16 साली शिळा मंदिराच काम सुरू झालं. राजस्थान येथील एका खाणीतील दडगापासून तुकोबारायांची मूर्ती घडवण्यात आली आहे. तुकोबांचे वय 42 सांगण्यात आलं होतं. त्यामुळं त्याच वयातील तुकोबा साकारण्याचे मोठं आव्हान होतं. मात्र, अवघ्या 42 दिवसात मूर्ती घडवण्यात आली. मूर्तीमध्ये विणा, चिपळे, पगडी हे सर्व दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा - Tukaram Pagdi : पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या तुकाराम पगडीवरील अभंग बदलला; 'हे' आहे कारण

Last Updated : Jun 14, 2022, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.