ETV Bharat / city

34th Pune Festival पुण्याचे भूषण असलेला 34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या होणार उद्घाटन, नेत्रदीपक सोहळ्याला भाजप मंत्र्यांची मांदियाळी

author img

By

Published : Sep 1, 2022, 2:36 PM IST

पुणे फेस्टिव्हल ३४ व्या सोहळ्याचे 34th Pune Festival of Pune उद्घाटन उद्या शुक्रवार सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांचे अध्यक्षतेखाली श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि  गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. यासोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हेदेखील या प्रसंगी उपस्थित राहतील.

34th Pune Festival
पुण्याचे भूषण असलेला 34 व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्या होणार उद्घाटन

पुणे पुणे फेस्टिव्हल ३४ व्या सोहळ्याचे 34th Pune Festival of Pune उद्घाटन उद्या शुक्रवार सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांचे अध्यक्षतेखाली श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यात राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील Higher and Technical Education Minister Chandrakant Patil आणि गिरीश बापट हे प्रमुख पाहुणे आहेत. यासोबतच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील हेदेखील या प्रसंगी उपस्थित राहतील.

पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा भाजप मंत्र्यांची मांदियाळी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्या अध्यक्षेखालील सुरू झालेल्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा भाजप मंत्र्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यंदा ज्येष्ठ अभिनेते सुनील शेट्टी हेदेखील उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत. पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण कै. राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीस यंदाचा ३४ वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, पद्मविभूषणअभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम होणार आहेत.

अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी यांचे उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना नृत्य पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खासदार हेमा मालिनी यंदा उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना व दुसरे दिवशी त्यांचा योशोडा कृष्ण बॅले सादर करणार आहेत. समाजात विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड देऊन गौरविण्यात येते. यंदा ज्येष्ठ कायदेतज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, एन. ए. ए. सी. नॅकचे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना पुणे फेस्टिव्हल अवॉर्डने उद्घाटन सोहळ्यात गौरवले जाईल. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व सिम्बायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले जाईल.

पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचा उद्घाटन सोहळ्यात विशेष सत्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचा उद्घाटन सोहळ्यात विशेष सत्कार केला जातो. यंदा नवचैतन्य मंडळ डेक्कन जिमखाना आणि राजर्षी शाहू मंडळ, शुक्रवार पेठ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात येणार आहे.

भव्य उद्घाटन सोहळा पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळादेखील दरवर्षीप्रमाणे नेत्रदीपक असेल. ढोलताशांचा गजरात दीपप्रज्वलन व तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी गणेश वंदना सादर करून ३४व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करतील. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांच्या नव्या गीतावर आधारित २५ सहकलावंतांसह त्या गणेश वंदना सादर करतील. यानंतर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांची भाची व गायिका राधा मंगेशकर मोगरा फुलला आणि जय देव जय देव जय शिवराय ही गाणी सादर करून आदरांजली वाहतील.

भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना श्रद्धांजली अर्पण भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट तीर्थ विठ्ठल आणि माझे माहेर पंढरी या अभंगांद्वारे श्रद्धांजली अर्पण करतील. स्वरस्वप्न ग्रुपतर्फे ७ ते २२ वर्षे वयोगटातील ४० मुले व मुली भारतरत्न कै. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण कै. पं. शिवकुमार शर्मा यांना सामूहिक व्हायोलिनद्वारा श्रद्धांजली अर्पण करतील. याचे संगीत संयोजन स्वप्ना दातार यांनी केले आहे. १९५७ चे आझाद चित्रपटातील राधा ना बोले ना बोले ना बोले रे, हे लता दीदींचे प्रसिद्ध गाणे आणि शिवहरी या जोडीने अजरामर केलेली राग हंसध्वनीमधील जा तोसे नही बोलू कन्हैया हे द्रुत त्रितालमधील शास्त्रीय बंदिश झाला पद्धतीत व्हायोलिनवर सादर करणार आहेत.

महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा खेळ यंदा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा खेळ मांडीयेला.. हा दिंडीचा विशेष कार्यक्रम ६० वारकरी सादर करतील. हे वारकरी प्रेक्षकांतून दिंडी घेऊन मंचावर रिंगण करतील त्यानंतर फुगड्या, पाऊल्या, वाटचालीचा अभंग, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर करीत पखवाज, वीणा, टाळ तसेच पताका-झेंडे याद्वारे वारीचे दर्शन घडवतील. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि ज्ञानेश्वर माउलींचे पुजारी अवधूत गांधी यांनी याचे दिग्दर्शन व सादरीकरण केले आहे. यानंतर ‘कल्चर्स ऑफ इंडिया’ हा महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर होईल. पिंगा मराठी, घुमर राजस्थानी आणि भांगडा पंजाबी याद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात मीरा जोशी, मधुरा देशपांडे आणि नुपूर दैठणकर या तीन अभिनेत्री नृत्याविष्कार सादर करतील. याची संकल्पना, निर्मिति व दिग्दर्शन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे.

या फेस्टिव्हलमध्ये विविध राज्यातील कलाकार सहभागी यानंतर आपला अतुल्य भारत या संगीत व नृत्यमय कार्यक्रमात मिले सूर मेरा तुम्हारा या मधुर धूनवर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, झारखंड, मणिपूर, मिझोराम व केरळ येथील कलावंत आपापल्या राज्यातील संस्कृती, परंपरा, वेशभूषा, दागिने, पारंपारिक वाद्ये आणि विविध नृत्य प्रकार एकत्रित सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवतील. यामध्ये सत्रीय नृत्यांगना डॉ. देविका बोरठाकूर, भरतनाट्यम् नर्तक डॉ. परिमल फडके यांसह ६० हून अधिक विविध राज्यातील कलाकार सहभागी होत आहेत. याचे दिग्दर्शन डॉ. देविका बोरठाकूर आणि कुणाल फडके यांनी केला असून संकल्पना संयोजन करूणा पाटील यांनी केले आहे.

उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमात शेवटी लावणी उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमात शेवटी लावणी एक रूप अनेकमध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले, शर्वरी जमेनिस, आर्या परदेशी व मानसी नाईक या महाराष्ट्राची लावणी, गुजरातचा गरबा आणि दक्षिणेकडील टॉलीवूड फ्युजन नेत्रदीपक नृत्यातून बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या डायरेक्टर नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या वेळी पायल वृंद चे कलावंत तसेच व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टस्चे कलावंत ही साथ सांगत देणार आहेत.

ऑल इंडिया मुशायरा या उद्घाटन सोहळ्यानंतर श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रात्रौ ९.०० वाजता ऑल इंडिया मुशायरामध्ये डॉ. पॉपुलर मेरठी मेरठ, जौहर कानपुरी कानपूर, डॉ. नुसरत मेहदी भोपाळ, शकील आझमी मुंबई, हसन काझमी लखनौ,कुंवर जावेद राजस्थान, टिपिकल जगतीयाली तेलंगणा, सुरिंदरसिंग शाजर (दिल्ली), वारीस वारसी उत्तर प्रदेश, विभा शुक्ला बनारस, अश्फाक नीझामी मरुली जळगाव हे राष्ट्रीय शायर सहभागी होत असून याचे सूत्रसंचालन डॉ. महताब आलम (भोपाळ) करणार आहेत. भारतीय लष्कराचे माजी उप सेनाप्रमुख आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्ट. जन. ज़मीरउद्दीन शाह निवृत्त हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्र कॉस्मोपौलिटीयन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार व उपाध्यक्षाआबेदा इनामदार यांनी याचे संयोजन केले आहे.

हेही वाचा Ganeshotsav 2022 राधानगरी धरणाच्या हुबेहूब प्रतिकृतीपुढे गणपती विराजमान; पाहा व्हिडिओ

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.