पुणे - शिवसेनेकडून साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्ताने शिवसैनिक सूरज लोखंडे यांच्यावतीने तब्बल 3000 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे. 31 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
तब्बल 3000 मूर्तीचं वाटप
सर्वसामान्य नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात राहावा म्हणून पुण्यातील जनता वासहत येथील शिवसैनिक सूरज लोखंडे यांच्यावतीने जनता वसाहत परिसरातील 3000 घरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती वाटण्यात येणार आहे.मूर्ती वाटण्यासाठी काही प्रश्नावली बनवण्यात आली आहे.जो व्यक्ती या प्रश्नांची उत्तरे देईल त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्यात येणार आहे.मूर्तीच पवित्र राहावं यासाठीही नियमावली बनविण्यात आली आहे.अशी माहिती यावेळी सूरज लोखंडे यांनी यावेळी दिली.
महाराजांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून मूर्तीचं वाटप
आज समाजात धार्मिकवाद,समाजा समाजात भांडणे होत आहे.छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका समाजाचे नव्हते तर स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवा आणि महाराज फक्त शिवजयंती आणि निवडणुकांसाठी नव्हे तर नेहेमी आपल्या हृदयात राहावे म्हणून मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे.येणाऱ्या सोमवारपासून मूर्तींसाठी नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे जेणे करून 31 मार्च म्हणजेच शिवजयंती पर्यंत सर्वांपर्यंत ही मूर्ती पोहचावी आणि सर्वांनी शिवजयंती साजरी करावी या उद्देशाने सोमवारपासून नावनोंदणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा - कोरोनाचा वाढता आलेख, मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर!
हेही वाचा - छत्तीसगडमध्ये भुसुरुंग स्फोटात नागपूरचा जवान हुतात्मा