ETV Bharat / city

हिंजवडीत शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; एक गंभीर

author img

By

Published : Dec 30, 2019, 9:48 PM IST

Updated : Dec 30, 2019, 10:01 PM IST

पथदिवे बसवत असताना शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. आज(दि.30डिसें.)ला सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित प्रकार घडला असून यामध्ये एक कामगार गंभीर जखमी आहे.

3 died in pune due to electric shock
पथदिवे बसवत असताना शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली

पुणे - पथदिवे बसवत असताना शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. आज(दि.30डिसें.)ला सायंकाळी सहाच्या सुमारास संबंधित प्रकार घडला असून यामध्ये एक कामगार गंभीर जखमी आहे.

3 died in pune due to electric shock
लोखंडी शिडी सरकवताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

लोखंडी शिडी सरकवताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सागर आयप्पा माशाळकर (वय-20) सागर कुपू पारंडेकर (वय-19) राजू कुपू पारंडेकर (वय-35) अशी मृतांची नावे असून तिघेही चिंचवडचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माशाळकर, सागर आणि राजू पारंडेकर यांसह आणखी एक कामगार हिंजवडी एमआयडीसीतील फेज तीन येथे पथदिवे बसवत होते. एका ठिकाणचे काम संपल्यानंतर हे कामगार पुढील पथदिवे बसवण्यासाठी लोखंडी शिडी पुढे ढकलत होते. यावेळी पथदिव्यांच्या जवळून जाणाऱ्या विद्युत तारेला शिडीचा स्पर्श झाला; आणि चौघांनाही शॉक लागला. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.

संबंधित कंत्राट बाबर नावाच्या व्यक्तीला दिले असून त्याच्या मार्फत हे सर्व कामगार पथदिवे बसवत होते, अशी माहिती समोर आली आहे. हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Intro:mh_pun_02_av_kamgar_death_mhc10002Body:mh_pun_02_av_kamgar_death_mhc10002

Anchor:- पथदिवे बसवत असताना विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. सोमवारी सायंकाळी सहा च्या सुमारास सदर ची घटना घडली असून यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. लोखंडी सीडी पुढे घेऊन जात असताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागला अस पोलिसांनी सांगितले आहे.

सागर आयप्पा माशाळकर वय-२०, सागर कूपु पारंडेकर वय-१९, राजू कुपु पारंडेकर वय-३५, रा.तिघे ही चिंचवड या घटनेत आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर माशाळकर, सागर पारंडेकर, राजू पारंडेकर सह आणखी एक कामगार असे चार जण हिंजवडी एमआयडीसी फेज तीन येथे रस्त्यावर पथदिवे बसवत होते. त्यावेळी पथदिवे बसवून कामगार पुढील पथदिवे बसविण्यासाठी लोखंडी सीडी पुढे ढकलत घेऊन जात होते. तेव्हा, पथदिव्यांच्या वरून जाणाऱ्या विद्युत प्रवाह असणाऱ्या विजेच्या तारेला सीडी चा स्पर्श झाला. विद्युत प्रवाह सीडीमध्ये उतरल्याने चार जणांना शॉक लागला. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याच कंत्राट बाबर नावाच्या व्यक्तीला दिले असून त्यांच्या मार्फत हे सर्व कामगार पथदिवे बसविण्याचे काम करत होते. घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.