ETV Bharat / city

चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी आणखी एकाला अटक; २५ लाखांची रोकड जप्त - चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात ऑक्टोबर महिन्यात २० कोटींचे २० किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथक यांनी केली होती. तसेच पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

25 lakh cash seized in mephedrone drugs case in chakan
चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरणी आणखी एकाला अटक; २५ लाखांची रोकड जप्त
author img

By

Published : Dec 22, 2020, 9:15 AM IST

पुणे - चाकण येथे पकडण्यात आलेल्या २० कोटींच्या मेफेड्रोन प्रकरणी आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख २५ लाख रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत २० आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी ललित अनिल पाटील (वय ३२ रा. फ्लॅट नंबर ३०१ स्पेसओरीयन सोसा नाशिक रोड जि. नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

चाकण येथील मेफेड्रोन ड्रग्स प्रकरण

आरोपीकडून २५ लाखांची रोकड जप्त...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण परिसरात ऑक्टोबर महिन्यात २० कोटींचे २० किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ही कारवाई अमली पदार्थविरोधी पथक यांनी केली होती. तसेच पुढील तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. याप्रकरणी नाशिक येथून आरोपी ललितला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २५ लाखांची रोकड मिळाली आहे.

हेही वाचा - क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आयपीएलबाबत एक वाईट बातमी

२५ लाख रक्कम ही त्या ६५ लाखांपैकी असल्याचे निष्पन्न...

सदरची रक्कम अरविंदकुमार लोहरे, अफजल हुसेन अब्बास सुणसरा, मनोज पालांडे यांनी वकिल व केस मिटविण्याकरता दिलेल्या ६५ लाख रुपयांपैकी उर्वरीत रक्कम असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त यांनी केलेल्या विनंतीवरुन महाराष्ट्र शासनाने या केसच्या सुनावणीकरता विशेष सरकारी वकिल शिषीर हिरे यांची नियुक्ती केली आहे.

पोलिसांच्या पथकाने केली ही कारवाई...

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर बाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदिप पाटील, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठठल सानप, शैविश मगर, अशोक गारगोटे, प्रदिप यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.