पुणे - भारतीय सेना दलात भरती नर्सींग असिस्टेंट असणाऱ्या एका २४ वर्षीय तरूणाने त्याच्या पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या ( Soldier Committed Suicide in Pune ) केल्याचा खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी त्रासाबाबतचा एक व्हिडिओच तयार करून ठेवला असून, सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. अशी माहिती केशव पाटील (शेलार) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
'पत्नीच्या त्रासाला कंटाळून जवानाची आत्महत्या'
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत गोरख शेलार यांचा विवाह अश्विनी युवराज पाटील यांच्याशी १६ फेब्रुवारी २०२१ मध्ये झाला होता. विवाह झाल्यापासूनच पत्नीने आणि सासरच्या माणसांनी गोरख याला अनेक प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली होती. मयत गोरखला त्याची नोकरी घालवतो तसेच पत्नीचा गर्भपात केला असल्याचा आरोप करत धमक्या देण्यात आल्या आणि याच मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
पाच जणाविरुद्ध गुन्हा दाखल -
पोलीसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. वानवडी) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. शहादा, जि. नंदूरबार) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - Nashik Theft News : महिलांनी लंपास केला सोन्याच्या दागिन्यांचा बाॅक्स ; संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद